“एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा तिरस्कार कमी करावा”

0
173

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा पोटशूळ आणि तिरस्कार कमी करावा, असं वक्तव्य राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर  यांनी केलं आहे.

पक्ष सोडताना एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांना व्हिलन ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, आता त्यांनी हे थांबवावं, असं प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांना टारगेट करण्याचे काम करण्याचे आणि टीका करण्याचे काम एकनाथ खडसेंना दिले गेले असावे. एकनाथ खडसेंनी राज्यात अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर लक्ष घालून ते सोडवण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला प्रविण दरेकारांनी दिला आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ओबीसींना प्राधान्य देण्याचे काम झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. ओबीसींबद्दल भाजपची भूमिका राज्यातील सर्वांना माहिती आहे. ओबीसी समाजातील अनेक लोकांना सत्तेतील आणि पक्षातील सन्मानाची पदे दिली गेली आहेत, त्याचा विसर खडसेंना पडला असावा, असंही दरेकर म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

…कराण मुख्यमंत्री स्वत: बेरोजगार असल्यासारखे घरीच बसून असतात; निलेश राणेंची टीका

दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकला; प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

ऋतुराज गायकवाड युवा विराट कोहलीसारखा वाटतो; दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ स्टार खेळाडूचं मत

डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत सहभागी होणं अनेकांना पडलं महागात; सहभागी झालेल्या तब्बल 30 हजार जणांना कोरोनाचा धोका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here