देवेंद्र फडणवीसांनी चार महिन्यात सरकार पडणार या स्वप्नातून बाहेर पडावं- अशोक चव्हाण

0
305

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : रावसाहेब अंतापूरकर यांच्या विरोधात भाजपाने उपऱ्याला उमेदवारी दिली. यावरून पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाला खडेबोल सुनावले. अशोक चव्हाण बिलोली येथील प्रचार सभेत बोलत होते.

राज्यात सत्ता नसल्याने भाजपाच्या नाकीनऊ आलं आहे. भाजपा बाहेरच्या व्यक्तीला मैदानात उतरवून राज्यात पुन्हा सत्ता आणण्याचे स्वप्न पाहत आहे. भाजपा मुंगेरीलालच्या ‘मी पुन्हा येईन-पुन्हा येईन’ या स्वप्नातून बाहेर येण्यास तयार नाही. फडणवीससाहेब तुम्ही पुन्हा येणार नाही, आमचे सरकार कठोर परिश्रम करत आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : सरकार पडत नाही म्हणून बदमान करण्याचा प्रयत्न सुरू आहे; जयंत पाटलांची भाजपावर टीका

भाजपा सत्तेशिवाय टिकू शकत नाही, ही त्यांची अडचण आहे. त्यामुळे नको तिथे नाक खुपसण्यासाठी भाजपा संपुर्ण नांदेड जिल्ह्यात पालथा घालत आहे. आमचे सरकार भक्कमपणे काम करत आहे. पाच वर्ष नांदेड जिल्ह्यातील विकासाचा बोजवारा उडाला होता. मात्र, आता जिल्ह्यात विकासाची गंगा वाहू लागली आहे. पण येत्या चार महिन्यात सरकार पडणार, मी पुन्हा येणार या स्वप्नातून भाजपा बाहेर यायला तयार नाही. विरोधी पक्षाचा आमदार निवडून देऊन तुमचे काम होणार नाही. त्यामुळे जुने वाद विसरून भाजपाचा कचरा साफ करा, असंही अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; घाटकोपरमध्ये अनेकांचा मनसेत प्रवेश

बायकोनं मारलं तरी सांगतील की यात केंद्र सरकारचा हात आहे- देवेंद्र फडणवीस

“शरद पवारांच्या रूपानं राष्ट्रवादीला देशाचा एक सर्वोच्च नेता मार्गदर्शक म्हणून लाभला”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here