Home नांदेड बायकोनं मारलं तरी सांगतील की यात केंद्र सरकारचा हात आहे- देवेंद्र फडणवीस

बायकोनं मारलं तरी सांगतील की यात केंद्र सरकारचा हात आहे- देवेंद्र फडणवीस

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नांदेड : राज्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाराष्ट्राने गेल्या दीड वर्षांत अनेक नैसर्गिक आपत्ती बघितल्या. वादळ, अतिवृष्टी, महापूर या सगळ्यामुळे अतोनात नुकसान झालं. याच मुद्द्यावरुन भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. नांदेड जिल्ह्यातल्या कुंडलवाडी इथं देगलूर पोटनिवडणुकीसाठी झालेल्या प्रचार सभेत फडणवीस बोलत होते.

हे ही वाचा :“शरद पवारांच्या रूपानं राष्ट्रवादीला देशाचा एक सर्वोच्च नेता मार्गदर्शक म्हणून लाभला”

अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची पुरेशी रक्कम मिळालेली नाही. आपल्या सरकारच्या काळात आपण किती रक्कम प्रत्येक जिल्ह्याला दिलेली होती, हे मुद्दे दवेंद्र फडणवीस यांनी या भाषणात अधोरेखित केले.

राज्य सरकार स्वतः भ्रष्टाचार करत आहे आणि मदत द्यायची वेळ आली की केंद्राकडे बोट दाखवत आहे. हे सरकार इतकं लबाड आहे की काहीही झालं तरी ते केंद्र सरकारकडे बोट दाखवतात. मला तर असं वाटतंय की यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की केंद्र सरकारचा हात आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

“समीर वानखेडे हा काही भाजपचा कार्यकर्ता नाही, त्यामुळे त्याची पाठराखण करायचा विषय येत नाही”

नवाब मलिकांनी इंटरव्हलपर्यंतची गोष्ट सांगितली, आता पुढची कथा मी सांगणार- संजय राऊत

माझे आणि राष्ट्रवादीचे पॅनेल 100 टक्के विजयी होणार; शिवेंद्रराजे भोसलेंनी व्यक्त केला विश्वास