आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई | महात्मा गांधींचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं सांगितलं जातं. परंतु, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील होते, असं वादग्रस्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी काल बोलताना केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे वातावरण चांगलंच पेटलंय. राज्यात ठिकठिकाणी संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला जात आहे. काँग्रेसकडून राज्यात आंदोलन करण्यात येत आहेत. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजी भिडे गुरुजींनी जे वक्तव्य केलंय त्याचं मी पूर्णपणे निषेध करतो. महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये महात्मा गांधी याच्यांकडे महानायक म्हणून पाहिलं जातं. महानायकाबाबत असं अनुचित वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : आदित्य ठाकरेंनी साैंदर्य पाहून खासदारकी दिली, शिरसाटांच्या वक्त्यावर, प्रियांका चतुर्वेदींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या…
माझं स्पष्ट मत आहे की अशा प्रकारचं वक्तव्य हे भिडे गुरुजी आणि कुणीही करु नये” अशा वक्तव्यांमुळे लोकांमध्ये संताप निर्माण होतो. लोकं महात्मा गांधी यांच्याबाबत बोललेलं कधीही सहन करणार नाहीत. याबाबत जी कारवाई करायची असेल ती राज्य सरकार करेल. महात्मा गांधी असोत किंवा स्वातंत्र्य सावरकर असोत, कुणाच्या विरोधात बोललेलं खपवून घेणार नाहीत”, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, या वक्तव्याविरोधात अमरावतीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी भिडे यांनी केलेल्या या वक्तव्याचं राज्यातील अनेक नेत्यांकडून निषेध करण्यात येत आहे. संभाजी भिडे यांनी वारंवार असे वादग्रस्त वक्तव्य करु नयेत, अशा प्रतिक्रियाही समोर येत आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
लवकरच शरद पवार भाजपाला पाठिंबा देतील; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
मणिपूर घटनेवरून, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले, अरे लाज वाटली पाहिजे…
संभाजी भिडेंना अटक करा, काँग्रेसच्या मागणीवर आता भाजपची प्रतिक्रिया, म्हणाले…