Home महाराष्ट्र लवकरच शरद पवार भाजपाला पाठिंबा देतील; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

लवकरच शरद पवार भाजपाला पाठिंबा देतील; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्यासह जवळपास ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. यावर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलंय.

ही बातमी पण वाचा : संभाजी भिडेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर, जयंत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले, समाजात दुही माजवणाऱ्या…

“शरद पवारांनी आता भाजपाबरोबर येण्यास नकार दिला आहे. पण कालांतराने शरद पवार भाजपाला पाठिंबा देतील. राष्ट्रवादी पक्ष एकच आहे. काही वेळ जाऊ द्यावा लागतो. देश कल्याणासाठी काय केलं पाहिजे? असा विचार कधी ना कधी त्यांच्याकडून होईलच,” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

“सध्या विरोधीपक्षात खूप संभ्रम आहे. जसं-जसं २०२४ वर्ष जवळ येईल, तसं-तसं तुम्हाला विरोधीपक्षाच्या विधानमंडळातल्या खुर्च्या कमी होताना दिसतील” असंही बावनकुळे म्हणाले. ते परभणी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महत्त्वाच्या घडामोडी –

संभाजी भिडेंना अटक करा, काँग्रेसच्या मागणीवर आता भाजपची प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवारांसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली?; नाना पटोलेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

‘इर्शाळवाडी ग्रामस्थांनी आठ वर्षांपूर्वीच…’; मनसेचं ट्वीट चर्चेत