Home महत्वाच्या बातम्या मोठी बातमी! करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, राज्यात करोनाचे ‘इतके’ नवे रुग्ण

मोठी बातमी! करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, राज्यात करोनाचे ‘इतके’ नवे रुग्ण

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यात हळूहळू करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून मंगळवारी ३७ नवे रुग्ण आढळले आहेत.

मुंबईमध्ये १९ रुग्णांचा समवेश आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १६८ वरून १९४ इतकी झाली आहे.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंचा एकही खासदार निवडून येणार नाही; नारायण राणे यांचा मोठा दावा

राज्यातील रुग्णांची संख्या ८१ लाख ७२ हजार २०० इतकी झाली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यात सोमवारी २८ नवे रुग्ण सापडले असताना मंगळवारी त्यात वाढ होऊन ३७ नवे रुग्ण सापडले.

दरम्यान, मुंबईमध्ये सर्वाधिक १९, पुणे ६, हिंगोली ३, रायगड व नवी मुंबईमध्ये प्रत्येकी २, ठाणे मनपा, जळगाव, कोल्हापूर मनपा, नांदेड, नागपूर मनपामध्ये प्रत्येकी एक करोनाचा रुग्ण सापडला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

पुण्यात कडाक्‍याची थंडी! ‘बोत्रे’ कुटुंबाकडून विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

मोठी बातमी! मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येत सत्ता स्थापन करणार होते, पण…; ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट