Home पुणे पुण्यात कडाक्‍याची थंडी! ‘बोत्रे’ कुटुंबाकडून विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

पुण्यात कडाक्‍याची थंडी! ‘बोत्रे’ कुटुंबाकडून विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे  : राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 25 डिसेंबर दरम्यान तापमानात किंचित वाढ होईल त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत पुन्हा थंडीची लाट पाहायला मिळणार आहे.

याच पार्श्वभूमीवर ओंकार साखर कारखाना प्रा. लि. यांच्याकडून गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. यावेळी ओंकार साखर कारखाना प्रा. लि. च्या संचालिका रेखा बोत्रे पाटील, संचालक ओंकार बोत्रे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात बोत्रे पाटील कुटुंबीयांचा सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक आहे.सदर वेळी संचालिका रेखाताई बोत्रे पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

सद्या कडाक्याची थंडी आहे. विद्यार्थ्यांना ओंकार साखर कारखाना प्रा. लि. यांच्याकडून स्वेटर दिल्याने जणूकाही या थंडीमध्ये मायेची ऊब मिळाली असल्याची भावना मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी व्यक्त केली. स्वेटरकरीता पाठपुरावा व कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक रणजित बोत्रे यांनी केले.

सूत्रसंचालन दिपाली गावडे यांनी केले. मान्यवरांचे आभार गीतांजली कांबळे यांनी मानले. सदर कार्यक्रमात निवेदक , व्याख्याते लक्ष्मण जाधव विशेष अतिथी म्हणून लाभले. यावेळी मंदाकिनी बलकवडे व पालकवर्ग उपस्थित होता.

महत्त्वाच्या घडामोडी – 

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र येत सत्ता स्थापन करणार होते, पण…; ‘या’ नेत्याचा गौप्यस्फोट

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

कोरोनाचा नवा व्हेरिएंट ; मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर, आरोग्य विभागाला केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना