Home अमरावती राम मंदिरावरून शरद पवार यांची भाजपवर टीका; म्हणाले…

राम मंदिरावरून शरद पवार यांची भाजपवर टीका; म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : भाजपा राम मंदिराचे राजकारण करत आहे की व्‍यवसाय हे त्‍यांनाच ठाऊक, अशी टीका राष्‍ट्रवादी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. ते बुधवारी अमरावतीत पत्रकारांशी बोलत होते.

अयोध्‍येत राम मंदिर उभारले गेले, त्‍याचा आपल्‍याला आनंद आहे. अयोध्‍येतील राम मंदिर प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याचे निमंत्रण आपल्‍याला मिळालेले नाही. साधारणपणे पूजा-अर्चना ज्‍या ठिकाणी होते, त्‍या ठिकाणी सहसा जात नाही. प्रत्‍येकाची वैयक्तिक श्रद्धा असते. त्‍याला आपला विरोध नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : मोठी बातमी! करोना रुग्णांच्या संख्येत वाढ, राज्यात करोनाचे ‘इतके’ नवे रुग्ण

उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळाले की नाही, हे आपल्‍याला माहीत नाही. असंही पवार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्‍या तयारीसाठी महाराष्‍ट्रात मी अध्‍यक्ष असलेल्‍या राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्‍या नेतृत्‍वातील शिवसेनेची बैठक होणार आहे. त्‍यात चर्चा होऊन जागा वाटपाचे सूत्र ठरेल, असं पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्त्वाच्या घडामोडी – 

उद्धव ठाकरेंचा एकही खासदार निवडून येणार नाही; नारायण राणे यांचा मोठा दावा

पुण्यात कडाक्‍याची थंडी! ‘बोत्रे’ कुटुंबाकडून विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप

मोठी बातमी! मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात