Home महत्वाच्या बातम्या सांगलीमध्ये आणखी तिघांना कोरोना…

सांगलीमध्ये आणखी तिघांना कोरोना…

298

सांगली :  मिरजेच्या भारतनगरमधील महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे रात्री कोरोना चाचणी अहवालावरून स्पष्ट झाल्याने गुरुवारी हा परिसर सील करण्यात आला. तर तीन रुग्णांचा चाचणी अहवाल नकारात्मक आल्याने त्यांची कोरोनातून मुक्तता झाली आहे.

मिरजेतील भारतनगरमध्ये वास्तव्य असलेल्या दिल्लीहून आलेल्या ३० वर्षीय महिलेचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. तर आटपाडी तालुक्यात आलेल्या दोन व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला असल्याचे नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले. तसेच आटपाडी तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे सातारा जिल्ह्य़ातील मायणी येथून आलेल्या एकाला आणि मुंबईहून आटपाडीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली असल्याचे बुधवारी रात्री मिळालेल्या कोरोना चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले.

महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी या परिसराची पाहणी केली. या भागात आरोग्य विभागाच्या वतीने रॅपिड सव्‍‌र्हे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आशा वर्कर्स आणि डॉक्टर यांच्यामार्फत या परिसरातील नागरिकांची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच जिल्ह्य़ात कोरोनाग्रस्त असलेल्या २६ रुग्णांवर सध्या मिरजेच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

एअरटेलचा नवीन प्लॅन लाँच; दिवसभरात वापरता येणार 50 GB डेटा

गुंडगिरी प्रवृत्तीचे लोकं जेव्हा राजकारणात येतात तेव्हा…; प्रकाश आंबेडकरांच निलेश राणेंवर टीकास्त्र

आपल्या बुडाखाली काय शिजतंय ते चंद्रकांत पाटलांनी पहावं- सतेज पाटील

राष्ट्रवादीत व बाहेर रोहित पवारला कोणीही पसंद करत नाही; निलेश राणेंच मोठ वक्तव्य