आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बुलढाणा | जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यात उमटले आहेत. या घटनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज 5 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
मराठा आरक्षण आणि आंदोलनाशी संबंधित या घोषणा आहेत. तसेच कुणीही विरोधकांच्या नादी लागू नका. विरोधक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.
ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरे अंतरवाली-सराटीत दाखल, दाखल होताच ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले…
आंदोलकांवर लाठीमार केल्या प्रकरणी जालन्यातील पोलीस अधीक्षकाला आम्ही सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे, डीवायएसपीला जिल्ह्यातून बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत, अतिरिक्त पोलीस महासंचालक सक्सेना हे उद्याच जालना येथे येतील आणि दोषींना निलंबित केलं जाईल, मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेची वेळ पडल्यास न्यायालयीन चौकशीही केली जाईल,अश्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी बुलढाण्यात आले होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
…तुमचेही तुरूंगात जाण्याचे दिवस येणार; उध्दव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवर, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…