Home महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या वडील चोरायला निघाले म्हणणाऱ्या टीकेला, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं...

उद्धव ठाकरेंच्या वडील चोरायला निघाले म्हणणाऱ्या टीकेला, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं, आणि शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. या बंडखोरीवरून आता शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर आता हल्लाबोल केला आहे.

शिवसेनेशी गद्दारी करणारे हे बंडखोर नाहीत तर हरामखोर आहेत, नमकहराम आहेत. शिवसेनेसोबत ते माझे वडीलही चोरायला निघाले आहेत, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी बंडखोरांवर केली. यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा राज ठाकरेही त्याला कारणीभूत होते; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा आरोप

बाळासाहेब हे आम्हाला कुटुंबप्रमुखाप्रमाणे होते ते आमच्या वडिलांसारखेच होते असं एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत धनगर मेळावा आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर दिल्लीला रवाना होण्यापूर्वी शिंदेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एकनाथ शिंदेंनी माझा कायम सन्मानच केला; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्या कडून कौतुक

‘राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढायला तयार, फक्त…; अब्दुल सत्तारांचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचं निधन, वयाच्या 91 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास”