Home महाराष्ट्र “राज ठाकरेंची तुलना बाळासाहेबांशी होऊ शकते का?; नारायण राणेंनी दिलं उत्तर, म्हणाले…...

“राज ठाकरेंची तुलना बाळासाहेबांशी होऊ शकते का?; नारायण राणेंनी दिलं उत्तर, म्हणाले… साहेब म्हणजे…”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतली. राज यांनी घेतलेल्या या निर्णयावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

भोंग्याला विरोध नाही, पण बेकायदेशीर भोंग्यांबद्दल त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मग ते अनधिकृत भोंगे का ठेवावेत?, असा सवाल राणेंनी यावेळी उपस्थित केला. तसेच राज ठाकरे कायदेशीर बोलले असून राज्य सरकारला पावले उचलावी लागतील, असंही राणे म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

हे ही वाचा : “कुणाला धोका असेल आणि सुरक्षा पुरविली जात असेल तर हरकत नाही”

दरम्यान, यावेळी राणेंना, राज ठाकरे यांची हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी तुलना होऊ शकते का?, असा प्रश्न विचारला असता, त्यावर राणेंनी उत्तर दिलं. राज ठाकरेंची बाळासाहेबांशी तुलना करु शकत नाही, असं राणे म्हणाले. बाळासाहेबांची तुलना कोणाशीही करू इच्छित नाही. साहेब म्हणजे हिंदुत्वाचा पेटता निखारा होता. त्यांनी कधीच तडजोडी केल्या नाहीत, सौदेबाजी केली नाही. सत्तेसाठी किंवा पैशासाठी हिंदुत्वाशी गद्दारीचा विचारही डोक्यात आला नाही. आतासारखे नाही, एक मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्ववादी पक्षाला सोडलं. बाळासाहेबांनी कधी असा विचारही केला नव्हता, असं राणेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड, मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, मंत्रीपद परत मिळणार?; चर्चांना उधाण”

राज ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी निव्वळ…; शिवसेनेची खोचक टीका

शिवसेनेच्या ‘या’ आमदारांच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या