Tuesday, October 13, 2026
Home Blog

मुंबईत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ची घोषणा; ऑक्टोबरमध्ये पुण्यात रंगणार क्रिकेटचा थरार

0

मुंबई : क्रिकेट, मनोरंजन आणि उद्योगविश्वाचा अनोखा संगम असलेल्या बहुप्रतीक्षित ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’ (CTC) ची घोषणा मुंबईत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत करण्यात आली. या पत्रकार परिषदेला अभिनेता सुनील शेट्टी, सोहेल खान, अभिनेत्री दीपली साय्यद, सिद्धांत मोरे आणि हाफिज बेग यांची प्रमुख उपस्थिती होती.

DivaTales Events प्रस्तुत ‘सेलिब्रिटीज अँड टायकून्स कप’चा मुख्य क्रिकेट सामना ऑक्टोबर महिन्यात पुण्यात आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सेलिब्रिटीज, उद्योजक, व्यावसायिक आणि क्रिकेटप्रेमींना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

CTC ही केवळ क्रिकेट स्पर्धा नसून क्रिकेट, मनोरंजन आणि बिझनेस नेटवर्किंगचा अनोखा संगम ठरणार आहे. विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती या उपक्रमाशी जोडल्या जाणार असून, सेलिब्रिटीजची उपस्थिती हे या स्पर्धेचे प्रमुख आकर्षण असणार आहे.

या प्रसंगी मुंबई हिरोजचे कर्णधार सुनील शेट्टी, मुंबई हिरोजचे सोहेल खान, CTCच्या ब्रँड ॲम्बेसेडर दीपली साय्यद, ब्रँड आयकॉन सिद्धांत मोरे तसेच CTC आणि DivaTales चे CMD हाफिज बेग यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी Gravity Group चे CMD मीहिर कुलकर्णी, Apli Sakhi च्या संचालिका संगीता तर्डे तसेच Pune Tycoons चे कर्णधार आणि Smita Holidays चे CMD जयंत गोरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाबद्दल उत्साह व्यक्त केला. क्रिकेटच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्र आणि उद्योगविश्व यांच्यातील संवाद तसेच परस्पर संबंध अधिक दृढ करणे, हा CTCचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेनंतर आता ऑक्टोबरमध्ये पुण्यात होणाऱ्या CTC सामन्याकडे क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्राचे लक्ष लागले आहे. सेलिब्रिटीजचा जलवा, क्रिकेटचा थरार आणि मनोरंजनाची रंगत यामुळे हा क्रिकेट महोत्सव संस्मरणीय ठरण्याची अपेक्षा आहे.

हायकोर्टाने कारवाई बाबत प्रश्न विचारले.. मुंढे नी थेट हायकोर्टाच्या कँटीन वरच छापा..

0

मुंबई | प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालय परिसरातील कॅन्टीनची अचानक तपासणी केली. या कारवाईदरम्यान कॅन्टीनमधील स्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचे पालन, FSSAI परवाना, अन्न साठवणुकीची व्यवस्था, स्वयंपाकघराची स्वच्छता तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्य व स्वच्छतेची सखोल पाहणी करण्यात आली.

उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुरू असलेली FDA ची तपासणी मोहीम केवळ खासगी हॉटेल व उपहारगृहांपुरती मर्यादित न ठेवता, सरकारी आणि निमसरकारी संस्थांमधील कॅन्टीनचीही तपासणी होत आहे का, याबाबत माहिती सादर करण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर FDA चे पथक थेट मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले.

या तपासणीचा उद्देश न्यायालयीन परिसरात येणारे वकील, कर्मचारी, पक्षकार आणि सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध होत आहे की नाही, याची खात्री करणे हा आहे. तपासणीत आढळणाऱ्या त्रुटींवर आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असून, अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले.

राज्यात अन्न सुरक्षेबाबत सुरू असलेल्या विशेष मोहिमेचा भाग म्हणून सरकारी कार्यालये, मंत्रालय तसेच इतर सार्वजनिक संस्थांमधील कॅन्टीनचीही तपासणी पुढील काळात सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Utkarsh Creations : उत्कर्ष क्रिएशन्सला ‘बेस्ट अबॅकस इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट अवॉर्ड’

0

पुणे : अबॅकस शिक्षण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण आंतरराष्ट्रीय कामगिरी आणि गुणवत्तापूर्ण प्रशिक्षणाची दखल घेत उत्कर्ष क्रिएशन्स या संस्थेला तैवान येथे आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेदरम्यान प्रतिष्ठेचा ‘Best Abacus International Institute Award’ प्रदान करण्यात आला.

हा बहुमान स्वीकारताना संस्थेचे संस्थापक अमित शिंदे आणि संचालिका संध्या शिंदे यांनी भारतीय पारंपरिक वेशभूषेत उपस्थित राहून भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने प्रतिनिधित्व केले. त्यामुळे हा क्षण संस्थेसाठी तसेच भारतासाठीही अत्यंत गौरवास्पद ठरला.

उत्कर्ष क्रिएशन्सने अबॅकस, वेदिक मॅथ्स आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घवघवीत यश मिळवून दिले आहे. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, एकाग्रता, गणितीय कौशल्य आणि मानसिक विकास घडवून आणण्यात संस्थेचे मोलाचे योगदान आहे.

यावेळी संस्थापक अमित शिंदे यांनी सांगितले, “हा पुरस्कार उत्कर्ष क्रिएशन्सच्या संपूर्ण परिवाराच्या अथक परिश्रमाचे आणि गुणवत्तेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. भविष्यातही जागतिक दर्जाचे शिक्षण देत भारताचे नाव अधिक उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

तसेच संचालिका संध्या शिंदे यांनी सांगितले, “हा पुरस्कार आमच्या प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षक, फ्रँचायझी आणि सहकाऱ्यांच्या विश्वासाचे आणि मेहनतीचे फळ आहे. हा सन्मान आम्हाला अधिक जोमाने आणि गुणवत्तेने कार्य करण्याची प्रेरणा देणारा आहे.”

या आंतरराष्ट्रीय पुरस्कारामुळे उत्कर्ष क्रिएशन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, संस्थेने भारताचे नाव जागतिक स्तरावर पुन्हा एकदा अभिमानाने उंचावले आहे.

अन् वेदवतीला न्याय मिळाला! नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला मृत्यदंडाची शिक्षा!

पुणे : पुण्यातील नसरापूर येथे घडलेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा अखेर निकाल लागला आहे. या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयाने दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

1 मे 2026 या दिवशी घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. आरोपी भीमराव कांबळे याने खाऊच आमिष दाखवत साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. गुन्हा लपवण्यासाठी त्याने चिमुकलीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवला होता. तपासादरम्यान समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी चिमुकलीचा हात धरून नेत असल्याचे स्पष्ट दिसून आले. या महत्त्वाच्या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुलीही दिली होती.

अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा जाहीर केली. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी या गुन्ह्याचे अत्यंत क्रूर स्वरूप अधोरेखित करत उपलब्ध पुरावे आणि परिस्थितीजन्य बाबींचा विचार करून हा निर्णय दिल्याचे नमूद केले.

दरम्यान, या निर्णयामुळे राज्यभर गाजलेल्या या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या –

क्राफ्टिझन फाउंडेशनतर्फे बौद्धिक दिव्यांग प्रौढांच्या उपजीविका सक्षमीकरणासाठी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक कार्यक्रम यशस्वी

सख्ख्या भावाचाच गेम? विधानपरिषद उमेदवारीवरून गोरे बंधूंमध्ये धुसफूस!

टारगेट पूर्ण करा.. पक्षाला निधी द्या अन्यथा राजीनामा द्या पार्थ पवारांचा आमदार-मंत्र्यांना नवीन फर्मान..!

क्राफ्टिझन फाउंडेशनतर्फे बौद्धिक दिव्यांग प्रौढांच्या उपजीविका सक्षमीकरणासाठी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक कार्यक्रम यशस्वी

पुणे :  २० जून २०२६: बौद्धिक दिव्यांग प्रौढांच्या उपजीविका संधी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने क्राफ्टिझन फाउंडेशनतर्फे १५ ते २० जून २०२६ दरम्यान सहा दिवसीय “प्रशिक्षणार्थी प्रशिक्षक” (Training of Trainers – ToT) कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत मॉड्यूल २ चे प्रशिक्षण १५ ते १७ जून आणि मॉड्यूल ३ चे प्रशिक्षण १८ ते २० जून या कालावधीत पुणे येथील जे. पी. नाईक सेंटरमध्ये पार पडले.

या प्रशिक्षणात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल राज्यांतील बौद्धिक दिव्यांग व्यक्तींसोबत कार्य करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांचे मास्टर ट्रेनर्स आणि प्रतिनिधींनी उत्साहाने सहभाग नोंदविला. सहभागीांना उत्पादन निर्मिती, गुणवत्ता व्यवस्थापन, उपजीविका कौशल्ये, प्रशिक्षण पद्धती आणि सामाजिक उद्योग उभारणी यांसंबंधी सखोल व प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.

हा उपक्रम बजाज फिनसर्व्ह आणि अॅक्सेन्चर यांच्या सहकार्याने राबविण्यात आला. या संस्थांच्या पाठबळामुळे बौद्धिक दिव्यांग प्रौढांसाठी कौशल्यविकास व बाजारपेठेशी जोडलेल्या उपजीविका संधी निर्माण करण्याच्या क्राफ्टिझनच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळत आहे.

मॉड्यूल २ च्या समारोप समारंभास निर्माण फाउंडेशनचे संचालक श्री. संतोष जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करून समावेशक उपजीविका निर्माण करण्यासाठी कार्यरत संस्थांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

मॉड्यूल ३ च्या समारोप समारंभास सीवायडीए (CYDA) चे संयुक्त संचालक डॉ. नितीन जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी प्रमाणपत्रांचे वितरण करताना सहभागी प्रशिक्षकांना आपल्या कार्यक्षेत्रात परिवर्तनाचे वाहक बनण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी क्राफ्टिझन फाउंडेशनच्या संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. मयुरा बालसुब्रमणियन यांनी देशभरात दर्जेदार प्रशिक्षण पोहोचविण्यासाठी सक्षम मास्टर ट्रेनर्सची फळी उभारण्याचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रम संचालक सौ. तुलसी स्वर्ण लक्ष्मी यांनी विविध भागीदार संस्थांच्या सहकार्यामुळे उपजीविका क्षेत्रातील परिणामकारकता वाढत असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमाचे समन्वयन वरिष्ठ कार्यक्रम व्यवस्थापक श्री. शिवरुद्र लुपणे यांनी केले. प्रशिक्षण सत्रांचे संचालन श्री. कार्तिक सी., सौ. आकांक्षा गुप्ता, सौ. सिद्धी अवस्थी आणि सौ. पायल कुमारी यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी क्राफ्टिझनचे विभागीय व्यवस्थापक श्री. भरत राऊत, सौ. प्रिया शिंदे, श्री. रमण टेकाळे आणि श्री. नीरज शर्मा यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

बौद्धिक दिव्यांग प्रौढांना कौशल्यविकास, उद्यमशीलता आणि शाश्वत उपजीविका संधी उपलब्ध करून देण्याच्या क्राफ्टिझन फाउंडेशनच्या व्यापक ध्येयाचा हा प्रशिक्षण कार्यक्रम एक महत्त्वाचा टप्पा ठरला असून, सहभागी प्रशिक्षकांमार्फत देशातील विविध भागांत या उपक्रमाचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

सख्ख्या भावाचाच गेम? विधानपरिषद उमेदवारीवरून गोरे बंधूंमध्ये धुसफूस!

टारगेट पूर्ण करा.. पक्षाला निधी द्या अन्यथा राजीनामा द्या पार्थ पवारांचा आमदार-मंत्र्यांना नवीन फर्मान..!

केवळ ३०० रु गोपाळगड किल्ल्याचे मालक युनूस हुसैन मणियार कसे झाले?

चांदगडचे पाटील मिरजेच्या कदमांनवर नाराज??

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात सध्या एका नव्या चर्चेने जोर धरला आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे युवा प्रदेशाध्यक्ष समित कदम यांची वाढती राजकीय सक्रियता आणि विविध पक्षांच्या नेत्यांशी असलेला संपर्क यामुळे राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसरीकडे, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांची याबाबत नाराजी असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे.

राजकीय वर्तुळात चर्चा अशी की, मुख्यमंत्री असोत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील असोत, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे असोत किंवा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ असोत, अनेक महत्त्वाच्या बैठका, कार्यक्रम आणि चर्चांमध्ये समित कदम यांची उपस्थिती सातत्याने दिसून येते. त्यामुळे “प्रत्येक महत्त्वाच्या राजकीय घडामोडीत समित कदमांची मध्यस्थी का?” हा प्रश्न अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

विशेषतः गोकुळ दूध संघाच्या घडामोडींमध्ये समित कदम यांची भूमिका चर्चेत आली. गोकुळच्या बैठका आणि संबंधित राजकीय हालचालींमध्ये त्यांचा थेट संबंध नसताना देखील ते समन्वयक म्हणून पुढे येत असल्याची चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या विषयावरून मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची भूमिका घेतली होती.

मात्र, राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, या वादाची तीव्रता वाढू नये यासाठी समित कदम यांनी पडद्यामागे समन्वय साधण्याचा आणि दोन्ही बाजूंमध्ये संवाद घडवून आणण्याचा प्रयत्न केला. काहींच्या मते, याच भूमिकेमुळे आमदार शिवाजी पाटील नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

समित कदम हे केवळ पक्ष संघटनेपुरते मर्यादित न राहता कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील विविध सामाजिक, सहकारी आणि राजकीय प्रश्नांमध्ये सक्रिय भूमिका बजावताना दिसतात. युवकांमध्ये त्यांची वाढती लोकप्रियता आणि विविध स्तरांवरील संपर्कक्षमता यामुळे त्यांचा प्रभाव वाढत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

दुसरीकडे, स्पष्टवक्तेपणा आणि आक्रमक राजकीय भूमिकेसाठी ओळख असलेले आमदार शिवाजी पाटील हे कोणत्याही विषयावर थेट भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे समित कदम यांच्या वाढत्या प्रभावाबाबत त्यांच्या मनात नाराजी असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळत आहे.

  • या सर्व चर्चांमध्ये कोणत्याही नेत्याने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली, तरी “हे पाटील आणि ते पाटील” हा विषय सध्या कोल्हापूर-सांगलीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि सहकारी क्षेत्रातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

सख्ख्या भावाचाच गेम? विधानपरिषद उमेदवारीवरून गोरे बंधूंमध्ये धुसफूस!

सातारा | प्रतिनिधी

सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महायुतीतील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे. भाजपकडून धैर्यशील कदम यांना उमेदवारी जाहीर होताच खटाव-मानचे नेते शेखर गोरे यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेली खंत आता जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.

“साहेब, मी नक्की कुठे चुकलो?” या एका भावनिक प्रश्नाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाऊ आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या शब्दावर विश्वास ठेवत स्वतःच्या राजकीय आकांक्षा बाजूला सारणाऱ्या शेखर गोरे यांना आता विधानपरिषद उमेदवारीची संधी हुकल्याची भावना असल्याची चर्चा रंगली आहे.

गोरे कुटुंबाचे मान-खटाव तालुक्यातील राजकारणावर अनेक वर्षांपासून वर्चस्व राहिले आहे. मात्र काळानुसार दोन्ही भावांमधील राजकीय मतभेद अधूनमधून समोर येत राहिले. आता पुन्हा एकदा त्याच मतभेदांची कुजबुज सुरू झाली असून, कार्यकर्त्यांमध्येही नाराजीचे सूर ऐकू येत आहेत.

दरम्यान, “मी शांत आहे पण संत नाही” या संदेशामुळे शेखर गोरे यांनी अप्रत्यक्ष इशारा दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांमध्ये या नाराजीचे परिणाम दिसणार का, याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

राजकीय वर्तुळात आणखी एक चर्चा जोर धरत आहे. उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी असलेल्या जवळिकीमुळे शेखर गोरे यांचे राजकीय वजन वाढले असल्याचे मानले जाते. अशा परिस्थितीत त्यांच्या नाराजीमुळे सातारा जिल्ह्यातील समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सध्या एकच प्रश्न विचारला जात आहे—

“जयकुमार गोरेंच्या राजकीय उदयात सख्ख्या भावाचाच बळी गेला का?”

या प्रश्नाचे उत्तर आगामी राजकीय घडामोडींमध्ये मिळणार असले तरी, गोरे बंधूंच्या नात्यातील दुरावा आणि विधानपरिषद उमेदवारीचा वाद हा सध्या सातारा जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे.

— घडामोडी 24×7 Live

टारगेट पूर्ण करा.. पक्षाला निधी द्या अन्यथा राजीनामा द्या पार्थ पवारांचा आमदार-मंत्र्यांना नवीन फर्मान..!

0

पक्षाला निधी न दिल्यास मंत्री, आमदारांचा घेणार राजीनामा पार्थ पवार यांचा इशारा; राष्ट्रवादीत नाराजी

मुंबई :

पक्षाला निधी द्या; अन्यथा राजीनामा घेऊ, अशा कडक शब्दांत खासदार पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांसह आमदारांनाही इशारा दिला असल्याचे समजते.

केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पदाचा उल्लेख न केल्यावरून आधीच पक्षात नाराजी असताना आता निधीसाठी मंत्री आणि आमदारांना इशारा दिल्यामुळे या नाराजीत आणखी भर पडली आहे.

महायुतीमधील घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागील विधानसभा निवडणुकीवेळी ५३ जागा लढविल्या होत्या. त्यापैकी तब्बल ४१ उमेदवारांचा विजय झाला. तर, रायगड लोकसभा मतदारसंघातून या पक्षाचे सुनील तटकरे हे एकमेव

उमेदवार विजयी झाले होते. त्या पक्षाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. मात्र, राज्य मंत्रिमंडळात या पक्षाचे एकूण ९ मंत्री आहेत. या सर्वांकडून पक्षवाढीसाठी आणि पक्ष चालवण्यासाठी पार्थ पवार यांनी ठरावीक निधीचे टार्गेट दिले आहे.

विशेष म्हणजे, आमदारांना आतापर्यंत अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी दिलेल्या फंडापैकी ठरावीक रक्कम पक्षाला देण्याच्या सूचना देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाच्या अधिकृत आर्थिक व्यवहारांच्या अधिकारांमध्ये नुकताच मोठा बदल केला आहे. यापूर्वी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजित पवार, राष्ट्रीय महासचिव व कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि खजिनदार वाय. पी. त्रिवेदी यांच्याकडे आर्थिक व्यवहारांचे अधिकार होते.

 

केवळ ३०० रु गोपाळगड किल्ल्याचे मालक युनूस हुसैन मणियार कसे झाले?

गोपाळगड किल्ला आणि मालकी वाद

गोपाळगड किल्ला हा कोणाच्या वैयक्तिक मालकीचा नसून सातबाऱ्यावर स्पष्टपणे “महाराष्ट्र शासन गोपाळगड किल्ला” असा उल्लेख आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील अंजनवेल गाव येथील श्री. युनूस हुसैन मणियार यांचा किल्ल्याशी कोणताही संबंध नसतानाही त्यांच्या कुटुंबाने गेल्या अनेक वर्षांपासून किल्ल्यावर कब्जा केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

माहितीनुसार, १९६० साली भ्रष्टाचारातून गुहागर तहसीलदार कार्यालयामार्फत खोटे कागदपत्र तयार करण्यात आले. केवळ ₹३०० मध्ये किल्ल्याच्या जागेचा लिलाव दाखवून श्री. युनूस हुसैन मणियार यांच्या वडिलांनी किल्ला विकत घेतल्याचे दस्तऐवज तयार करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर आजपर्यंत या कुटुंबाने किल्ल्यावर बेकायदेशीर कब्जा ठेवला असल्याचा आरोप आहे.

किल्ल्याच्या परिसरात तब्बल ३१८ आंब्याची कलमे लावून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले जात असल्याचेही सांगितले जात आहे. तसेच किल्ल्याची तटबंदी तोडून त्यातील दगडांचा वापर खंदक बुजवण्यासाठी करण्यात आला असून अनेक ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. किल्ल्याच्या आत वाहनांसाठी रस्ता तयार करण्यात आल्यामुळेही किल्ल्याच्या मूळ रचनेला धक्का बसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

यासोबतच गुहागर तहसीलदार कार्यालय आणि गुहागर पोलिस स्टेशन यांनी संबंधितांना हाताशी धरल्याचा आरोप करण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाणीमुळे कोणतीही कारवाई होत नसल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत स्थानिक लोकप्रतिनिधींचा या विषयाला पाठिंबा असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या गोपाळगड व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती ही श्री. युनूस हुसैन मणियार यांचा सुपुत्र असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून श्री. युनूस हुसैन मणियार यांच्यावर किल्ल्याचे नुकसान, बेकायदेशीर कब्जा आणि ऐतिहासिक वारशाची हानी केल्याप्रकरणी महाराष्ट्र पुरातत्व विभाग आणि केंद्रीय पुरातत्व विभागामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

गिरीमित्र प्रतिष्ठान, स्थानिक गिर्यारोहक अक्षय पवार, गुहागरचे पत्रकार, किल्लेप्रेमी, अंजनवेल गावचे रहिवासी आणि काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या प्रयत्नांमुळे अखेर सातबाऱ्यावर “महाराष्ट्र शासन गोपाळगड किल्ला” असा उल्लेख झाल्याचे सांगितले जात आहे.

– मंगेश बाळू कोयंडे
गिर्यारोहक – शिवप्रेमी – निसर्गप्रेमी
अध्यक्ष – गिरीमित्र प्रतिष्ठान

‘Don 3’ चं निमित्त की ‘बडे साहब’चा ऑर्डर? रणवीर सिंहवर बॉलिवूडने का घातली बंदी?

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर 2’ सारख्या चित्रपटांनंतर अभिनेता Ranveer Singh पुन्हा मोठ्या चर्चेत आला आहे. या चित्रपटांमधून दाऊद इब्राहिम आणि पाकिस्तानच्या कथित संबंधांवर भाष्य करण्यात आल्याने काही शक्तींना ते खटकले असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. त्यानंतर अचानक ‘Don 3’ वाद पुढे येत रणवीरविरोधात FWICE कडून नॉन-कोऑपरेशन डायरेक्टिव्ह जारी करण्यात आल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

विशेष म्हणजे, याआधीही अनेक मोठ्या कलाकारांनी चित्रपट सोडले किंवा प्रोजेक्टमधून माघार घेतली होती. मात्र त्यांच्याविरोधात अशा प्रकारची कठोर भूमिका क्वचितच पाहायला मिळाली. त्यामुळे रणवीर सिंहविरोधातील कारवाईमागे नेमके काय कारण आहे, याबाबत आता विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक मोठी चर्चा समोर येत आहे. ‘धुरंधर’ चित्रपटांमध्ये अंडरवर्ल्ड आणि पाकिस्तान संदर्भातील मुद्दे दाखवल्यानंतर अंडरवर्ल्डमधून काही दिग्दर्शक आणि निर्मात्यांना कथित इशारे देण्यात आल्याची चर्चा रंगत आहे. त्याच दबावातून काही मंडळी रणवीरविरोधात भूमिका घेत असल्याचेही बोलले जात आहे. मात्र या सर्व दाव्यांना कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.

सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी रणवीरच्या समर्थनार्थ पोस्ट करत “हा फक्त ‘Don 3’ वाद नाही, तर टार्गेटिंग आहे,” असा दावा केला आहे. त्यामुळे आता हा वाद केवळ चित्रपटापुरता मर्यादित न राहता बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड चर्चेपर्यंत पोहोचला आहे.