“आदित्य ठाकरेंकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम; फडणवीसांच्या नागपूरातील युवा मोर्चाचा ‘हा’ मोठा आता शिवसेनेत”

0
2

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : दादरा नगर-हवेलीच्या रिक्त झालेल्या लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुक पार पडली. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी भाजप उमेदवाराला पराभवाची धूळ चारत दणदणीत विजय मिळवला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी दादरा नगर हवेलीत सभा घेत मोठा हातभार लावला होता. यानंतर आदित्य ठाकरेंनी भाजपला दुसरा मोठा धक्का दिला.

हे ही वाचा : आम्ही नारायण राणेंसारख्यांना पुरून उरलो आहोत; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातच आदित्य ठाकरेंनी भाजपला मोठे खिंडार पाडले. नागपूर येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विशाल केचे यांनी काल मुंबईत आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश प्रवेश करत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

दरम्यान, फडणवीसांच्या होम ग्राऊंडवरील युवा नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्यानं भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

पुण्यात पुढची सत्ता राष्ट्रवादीचीच; ‘या’ आमदाराचा विश्वास

माणूस एकदम भला आहे, मात्र प्रॉब्लेम एकच कधीच खरं बोलत नाही; भातखळकराचा संजय राऊतांना टोला

देगलूरमध्ये काँग्रेसचा विजय; अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here