आम्ही नारायण राणेंसारख्यांना पुरून उरलो आहोत; गुलाबराव पाटलांचा हल्लाबोल

0
448

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : शिवसेना नेते व जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांनी खासदार निधीतून बांधलेली एक मुतारी तरी दाखवावी. ज्यांनी काहीच केले नाही, ते आमच्यावर काय टीका करतात. त्यामुळे शिवसेनेवर टीका करताना विचार करावा. आम्ही नारायण राणे सारख्यांना पुरून उरलो आहोत. तुम्ही तर माझ्या पुढे काहीच नाही, असंही गुलाबराव पाटील म्हणाले. भडगाव- पाचोरा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

हे ही वाचा : पुण्यात पुढची सत्ता राष्ट्रवादीचीच; ‘या’ आमदाराचा विश्वास

दरम्यान, शेतकऱ्यांसाठी भाजपने जळगावात मोर्चा काढला. मात्र आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. अतिवृष्टीची भरपाई मंजूर केली. एक चालू बील भरल्यावर वीज कनेक्शन न तोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. त्यामुळे भाजपने कोणत्या विषयावर मोर्चा काढला? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी – 

माणूस एकदम भला आहे, मात्र प्रॉब्लेम एकच कधीच खरं बोलत नाही; भातखळकराचा संजय राऊतांना टोला

देगलूरमध्ये काँग्रेसचा विजय; अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“उद्धव ठाकरे पंतप्रधान होणारच! शिवसेनेची दिल्लीकडे वाटचाल सुरु” 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here