आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : पुण्यात भाजपकडून उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मिळाला आहे . पुण्यातील ठाकरे गटातील माजी जिल्हाप्रमुख राम गावडे यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. येत्या बुधवारी राम गावडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
राम गावडे यांच्यासह समर्थकही भाजपमध्ये प्रवेश करणार असून राम गावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे ठाकरे गटाला पुण्यात मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.
ही बातमी पण वाचा : सुषमा अंधारे आक्रमक; संजय शिरसाट यांच्याविरोधात ठोकला ‘इतके’ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा
दरम्यान, काही महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसैनिकांना विकासासाठी काहीच दिले नाही. सतत अवमानाची वागणूक दिली गेली. वारंवार बैठका घेऊनही त्यावर काहीच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना घेऊन आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहोत, अशी प्रतक्रिया राम गावडे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या घडामोडी
शिवसेना ही काँग्रेसच्या मांडीला जाऊन बसली आहे, ते शोभते का?; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना सवाल
चेस मास्टर कोहली-फाफ ड्यू प्लेसिससमोर मुंबई फेल; आरसीबीने मुंबईचा 8 विकेट्सने उडवला धुव्वा