Home छत्रपती संभाजीनगर “मोठी बातमी! लोकसभेपूर्वीच काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप?; अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार?”

“मोठी बातमी! लोकसभेपूर्वीच काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप?; अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

छत्रपती संभाजीनगर : राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असतानाच काँग्रेस नेते अशोक चव्हाण लोकसभेपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार, तशा हालचाली सूरू झाल्या आहेत, असं मोठं विधान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

काँग्रेसमध्ये एक वाक्यता नाही. अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांचं जमत नाही. बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांचं जमत नाही. हे तुम्ही पाहत आहात. मला तरी असं वाटतंय की, अनेक दिवसांच्या ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यानुसार अशोक चव्हाण हे लोकसभेपूर्वी भाजपमध्ये जातील असं माझं मत आहे., असं संजय शिरसाट म्हणाले. ते माध्यमांशी बोलत होते.

ही बातमी पण वाचा : भाजपचा उध्दव ठाकरेंना मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश

एवढा नेता त्यांना काँग्रेसमध्ये वागणूक बरोबर मिळत नाही. ते निश्चितच भाजपमध्ये जातील, असं संजय शिरसाट म्हणाले. प्रयत्न तसेच चालू आहेत. अनेक घडामोडी तशा सुरू आहेत. बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार नाहीत. कारण विखे आणि थोरात यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे. विखे पाटील जर काँग्रेसमध्ये गेले तर थोरात भाजपमध्ये जातील. असं त्यांचं उलटंपालटं गणित आहे. पण अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याची मानसिकता तयार केली आहे, असा दावाही संजय शिरसाटांनी यावेळी केला. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, संजय शिरसाट यांनी आतापर्यंत ज्या ज्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. ते खरंच झालं आहे. त्यामुळे त्यांच्या या दाव्याकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे.

महत्त्वाच्या घडामोडी 

सुषमा अंधारे आक्रमक; संजय शिरसाट यांच्याविरोधात ठोकला ‘इतके’ रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा

शिवसेना ही काँग्रेसच्या मांडीला जाऊन बसली आहे, ते शोभते का?; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना सवाल

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव दिलं होतं, मात्र शरद पवारांनी…; ठाकरे गटातील नेत्याचा गौप्यस्फोट