Home महाराष्ट्र शिवसेना ही काँग्रेसच्या मांडीला जाऊन बसली आहे, ते शोभते का?; गुलाबराव पाटलांचा...

शिवसेना ही काँग्रेसच्या मांडीला जाऊन बसली आहे, ते शोभते का?; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना सवाल

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल महाविकास आघाडीच्या सभेत भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. याला आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

विरोधकांचं काम टीका करणं हे आहे. परंतु, शेतकऱ्यांच्या बाबतीत एनडीआरएफचे नार्म डबल करण्याचं काम आमच्या शिंदे-फडणवीस सरकारनं केलं आहे. 50 हजार रुपयांचं अनुदान ठाकरे सरकारने जाहीर केलं होतं. पण, त्यांनी ते पैसे दिले नाही. तेसुद्धा आम्ही शेतकऱ्यांना दिले. त्यांची उधारी आम्ही फेडली, असं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

ही बातमी वाचा : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव दिलं होतं, मात्र शरद पवारांनी…; ठाकरे गटातील नेत्याचा गौप्यस्फोट

दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागे आम्ही उभे राहिलो आहोत. सहाजिक आहे. सभा आहे. अमर, अकबर, अँथोनी एकत्र आले आहेत. त्यामुळे टीका करणे हे त्यांचं कामचं आहे, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी लगावला आहे.

बोलण्याचा भात आणि बोलण्याची कडी आता कुणी करू नये.शिवसेना ही काँग्रेसच्या मांडीला जाऊन बसली आहे. ते शोभते का?, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना केला.

महत्त्वाच्या घडामोडी 

चेस मास्टर कोहली-फाफ ड्यू प्लेसिससमोर मुंबई फेल; आरसीबीने मुंबईचा 8 विकेट्सने उडवला धुव्वा

तुम्ही सत्तेसाठी मिंदेंचं काय चाटत आहात; वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात

वज्रमूठ सभेमुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका