Home क्रीडा चेस मास्टर कोहली-फाफ ड्यू प्लेसिससमोर मुंबई फेल; आरसीबीने मुंबईचा 8 विकेट्सने उडवला...

चेस मास्टर कोहली-फाफ ड्यू प्लेसिससमोर मुंबई फेल; आरसीबीने मुंबईचा 8 विकेट्सने उडवला धुव्वा

बेंगलोर : आयपीएलचा 16व्या हंगामाला सूरूवात झाली असून आज आयपीएलचा पाचवा सामना राॅयल चॅलेंजर्स बेंगलोर विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात बेंगलोरने मुंबईचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला.

चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार फाफ ड्यू फ्लेसिसने टाॅस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट गमावत 171 धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने सर्वाधिक 46 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या. तर अरशद खानने 9 चेंडूत नाबाद 15 धावा करत तिलक वर्माला चांगली साथ दिली. तिलकने आपल्या खेळात 9 चाैकार, 4 षटकार ठोकले, तर बेंगलोरकडून कर्ण शर्माने 2, तर मोहम्मद सिराज, रिस टोप्ली, हर्षल पटेल, आकाश दीप, मायकल ब्रेसवेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

ही बातमी वाचा : तुम्ही सत्तेसाठी मिंदेंचं काय चाटत आहात; वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरेंचा घणाघात

दरम्यान, धावांचा पाठलाग करताना आरसीबीने हे लक्ष्य 16.2 षटकात 2 विकेट गमावत पूर्ण केलं. सलामीला आलेल्या कर्णधार फाफ ड्यू प्लेसिस व विराट कोहलीने आरसीबीला धमाकेदार सुरूवात करून दिली. फाफ-विराटने 14.5 षटकात 148 धावांची वेगवान भागीदारी केली. फाफने 43 चेंडूत 73 धावांची विस्फोटक खेळी केली. फाफने आपल्या खेळीत 5 चाैकार, 6 षटकार ठोकले. मात्र फटकेबाजी करण्याच्या नादात फाफने आपली विकेट गमावली. नंतर आलेल्या दिनेश कार्तिकही फटकेबाजी करण्याच्या नादात शून्यावर बाद झाला. नंतर ग्लेन मैक्सवेलने 3 चेंडूत नाबाद 12 धावा करत आरसीबीला विजयाच्या जवळ नेलं. नंतर आरसीबीला 5 धावांची गरज असताना विराटने षटकार ठोकत आरसीबीला विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या घडामोडी 

वज्रमूठ सभेमुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या पायाखालची वाळू सरकली; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

…तरीही हिंदूंना आक्रोश करावा लागतोय; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

आज जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असते तर…; मनसेचा उध्दव ठाकरेंवर निशाणा