Home पुणे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला धक्का; भाजप नगरसेविका राष्ट्रवादीच्या वाटेकर? मात्र…

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला धक्का; भाजप नगरसेविका राष्ट्रवादीच्या वाटेकर? मात्र…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या पुढाकाराने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ओळखपत्राचा वितरण सोहळा पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते शुक्रवारी रात्री भोसरीतील त्यांच्या प्रभागात झाला. मात्र या कार्यक्रमात भाजपच्या नगरसेविका प्रियंका बारसे यांनी हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

महापालिकेतील भाजपचे दोन नगरसेवक राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत. त्यांनी ते जाहीररित्या दाखवून दिले आहे. त्यात बारसे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने त्या ही भाजप सोडून हातावर घड्याळ बांधणार का अशी चर्चा लगेच सुरु झाली. मात्र, त्या चर्चेला त्यांनी लगेच ब्रेक लावला.

हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या रडगाण्याशी आम्हांला काही घेणं देणं नाही; विनायक राऊतांचा टोला

माझ्या प्रभागातला हा सोहळा होता. त्यात माझ्या मतदार बंधू-भगिंनीना पंतप्रधान जनआरोग्य योजनेची कार्ड मिळणार होती. त्यामुळे मी उपस्थित राहणे स्वाभाविक होते, असं बारसे म्हणाल्या आहेत.

दरम्यान, भोसरीचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे शहरातील ज्येष्ठ नेते विलास लांडे-पाटील हे कोल्हेंच्या या सोहळ्याला गैरहजर राहिल्याने चर्चेला आणखी उधाण आले. मात्र, आपण शहराबाहेर साताऱ्याला होतो. त्यामुळे आपला नगरसेवक मुलगा विक्रांत या कार्यक्रमाला हजर होता. असं लांडे यांनी स्पष्ट केल्याने या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यात ओम्रिकाॅनचा शिरकाव, लाॅकडाऊन लागणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

लस नाही तर बस नाही, डोकं आहे पण मेंदू नाही; मनसेचा राज्य सरकारवर हल्लाबोल

फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांना घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही; जयंत पाटलांचा टोला