Home महाराष्ट्र राज्यात ओम्रिकाॅनचा शिरकाव, लाॅकडाऊन लागणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

राज्यात ओम्रिकाॅनचा शिरकाव, लाॅकडाऊन लागणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : कोरोनाच्या नवा विषाणू ओम्रिकाॅननं संपूर्ण देशात दहशत निर्माण केली आहे. तसेच कर्नाटक, गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही ओम्रिकाॅननं शिरकाव केला आहे.

हे ही वाचा : लस नाही तर बस नाही, डोकं आहे पण मेंदू नाही; मनसेचा राज्य सरकारवर हल्लाबोल

महाराष्ट्रात ओम्रिकाॅन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण कल्याण डोंबिवलीमध्ये आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईमध्ये हा रुग्ण आला होता. तसेच या 33 वर्षीय तरुणामध्ये ओम्रिकाॅन हा व्हेरिएंट सापडल्याचं प्रयोगशाळा तपासणीतून सिद्ध झालं आहे. यानंतर आता राज्यात लाॅकडाऊन लागणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. यावरून आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्यातरी कोणतेही निर्बंध लावण्यावर विचार नाही. पण सर्वांनी काळजी घेणे गरजेचं आहे. कोरोनाची लस घेणे गरजेचं आहे. पहिला तसेच दुसरा डोस घ्यावा. परदेशातून येणाऱ्या लोकांनी कोरोनाचे दोन्ही डोस घेणे गरजेचं आहे. जोखीम असलेल्या देशातून प्रवाशी येत असतील तर त्यांची चाचणी केली जात आहे. त्यांना आठ दिवसांसाठी क्वॉरन्टाईन केले जात आहे. तसेच गृहविलगीकरणदेखील केले जात आहे. केंद्र सरकारच्या नियमावलीनुसार हे सगळे केले जात आहे, असं राजेश टोपेंनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

फडणवीसांना नाही तर चंद्रकांतदादांना घाई, पण त्यांचं नाव यादीतही नाही; जयंत पाटलांचा टोला

“अखेर महाराष्ट्रात ओम्रिकाॅन व्हेरियंटची एन्ट्री; ‘या’ शहरात आढळला पहिला रूग्ण”

“कंगणा रणाैत आता निवडणुकीच्या रिंगणात?; करणार ‘राष्ट्रवादी’चा प्रचार”