Home महाराष्ट्र ‘या’ माजी राज्यमंत्र्याची संभाजी भिडे यांना थेट जीवे मारण्याची धमकी

‘या’ माजी राज्यमंत्र्याची संभाजी भिडे यांना थेट जीवे मारण्याची धमकी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद पडताना दिसत आहेत. विधानसभेतही संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावरुन वातावरण तापल्याचं बघायला मिळालं.

राज्यभरात संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलनं केली जात आहेत. तर सोलापुरात संभाजी भिडे यांच्या समर्थकांनी आज दुग्धाभिषेक आंदोलन पुकारलं होतं. पण भिडे यांच्या समर्थकांनी गोंधळ घातल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना आता संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ही बातमी पण वाचा : “नितीन देसाईंच्या आत्महत्येवर, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले, नितीनसारख्या माणसानं असं पाऊल उचलणं…”

माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी संभाजी भिडे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून “भिडे गुरुजींना अटक करा. अन्यथा मी त्यांचा मर्डर करेल”, अशी धमकी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी दिली आहे.

दरम्यान, सुबोध सावजी यांनी गृहमंत्र्यांना निवेदन देऊन भिडेंवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

“मोठी बातमी! संभाजी भिडेंचा खून करणार; माजी राज्यमंत्र्यांचा इशारा, फडणवीसांना लिहिलं पत्र”

याचा अर्थ, फडणवीसांनी मान्य केलं की, संभाजी भिडेंना त्यांनीच…; भास्कर जाधवांचं वक्तव्य चर्चेत

धक्कादायक ! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या