आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेसोबत बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं. यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आणि त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यामुळे आता भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना पहायला मिळत आहे.
अशातच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये मात्र राजकारणातील नवीन फाॅर्म्युला चर्चेचा ठरत आहे. कारण या निवडणूकीत महाविकास आघाडीला भाजपचा गट जाऊन मिळाला आहे.
ही बातमी पण वाचा : “भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते”
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचा गट महाविकास आघाडीला जाऊन मिळाला आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी महाविकास आघाडी स्थापन केली आहे. तर त्यांच्या विरोधात भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार रिंगणात असणार आहे. मात्र असे असतानाच आता भाजपमध्ये तीन गट निर्माण झाले आहेत. ज्यातील एक महत्वाचा गट महाविकास आघाडीत सामील झाला आहे.
दरम्यान, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव, कैलास पवार, ज्ञानेश्वर जगताप, डॉ. राजीव डोंगरे यांचा गट महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनेलमध्ये सहभागी झाला आहे. तर भाजपचा दुसरा गट हा शिंदेसेनेसोबत आहे. तर तिसरा गट हा इतर पक्षांच्या आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या घडामोडी
तेव्हा एकनाथ शिंदे ‘मातोश्री’वर रडले होते; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
बाबरी मशीद पडली अन् बाळासाहेबांना फोन आला…; राज ठाकरेंचा जुना व्हिडीओ मनसेनं केला पोस्ट
“अखेर मुंबईनं विजयी खातं उघडलं, रंगतदार सामन्यात मुंबईचा, दिल्लीवर शेवटच्या चेंडूवर विजय”