Home क्रीडा “अखेर मुंबईनं विजयी खातं उघडलं, रंगतदार सामन्यात मुंबईचा, दिल्लीवर शेवटच्या चेंडूवर विजय”

“अखेर मुंबईनं विजयी खातं उघडलं, रंगतदार सामन्यात मुंबईचा, दिल्लीवर शेवटच्या चेंडूवर विजय”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सूरूवात झाली असून आजचा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबईने दिल्लीचा 6 विकेट्सने पराभव केला.

या सामन्यात दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना 19.4 षटकात सर्व बाद 172 धावा केल्या. दिल्लीकडून अक्षर पटेलने सर्वाधिक 25 चेंडूत 54 धावांची खेळी केली. अक्षरने आपल्या खेळीत 4 चाैकार, 5 षटकार ठोकले. तर कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने 47 चेंडूत 51 धावांची खेळी केली. वाॅर्नरच्या या खेळीत 6 चाैकरांचा समावेश होता. तर मुंबईकडून पीयूष चावला, जेसन बेहरनडाॅर्फने सर्वाधिक 3, तर राईली मैरेडिथने 2, शोकीनने 1 विकेट घेतली.

ही बातमी पण वाचा : बाबरी पाडताना तिथे प्रत्यक्ष शिवसैनिक कुणी नव्हतं; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

दरम्यान, धावसंख्येचा पाठलाग करताना , मुंबईने हे लक्ष्य 4 विकेट गमावत 20 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक 45 चेंडूत 65 धावांची खेळी केली. रोहितने आपल्या या खेळीत 6 चाैकार, 4 षटकार ठोकले. तर तिलक वर्मा 29 चेंडूत 1 चाैकार, 4 षटकारांसह 41 धावा, इशान किशन 26 चेंडूत 6 चाैकारांसह  31 धावा, टीम डेव्हिड 11 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 13 धावा, तर कॅमेरून ग्रीनने 8 चेंडूत 1 चाैकार, 1 षटकारासह नाबाद17 धावा करत मुंबईच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं. तर दिल्लीकडून मुकेश कुमारने 2, तर मुस्तफिजूर रेहमानने 1 विकेट घेतली.

महत्त्वाच्या घडामोडी 

“ठाकरे-पवारांमध्ये खलबतं, सिल्व्हर ओकवर सव्वा तास चर्चा, तर्कवितर्कांना उधाण”

 ही आहे राज ठाकरेंची पॉवर; ज्याने ललकारलं, आता तोच नेता म्हणतोय राज ठाकरेंचं अयोध्येत स्वागत करू

“चिन्नास्वामीवर स्टाॅयनिस, पूरनचं वादळ; अटीतटीच्या सामन्यात लखनाैचा RCB वर शेवटच्या चेंडूवर विजय”