Home महाराष्ट्र “ठाकरे-पवारांमध्ये खलबतं, सिल्व्हर ओकवर सव्वा तास चर्चा, तर्कवितर्कांना उधाण”

“ठाकरे-पवारांमध्ये खलबतं, सिल्व्हर ओकवर सव्वा तास चर्चा, तर्कवितर्कांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामध्ये आज बैठक पार पडली. शरद पवारांच्या सिलव्हर ओक या निवासस्थानी ही बैठक पार पडली. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

ठाकरे हे सिल्व्हर ओकवर पवारांची भेट घेण्यासाठी गेले होते, यावेळी त्यांच्यासोबत संजय राऊतही होते. तर शरद पवारांसोबत सुप्रिया सुळे होत्या. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

ही बातमी पण वाचा : ही आहे राज ठाकरेंची पॉवर; ज्याने ललकारलं, आता तोच नेता म्हणतोय राज ठाकरेंचं अयोध्येत स्वागत करू

मागच्या काही दिवसांपासून महाविकासआघाडीमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून वाद सुरू आहेत, त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना मित्रपक्षांना विचारात घेतलं नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी आजच केलं होतं. याशिवायही काही मुद्द्यांवरून महाविकासआघाडीमध्ये मतभेद आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी 

“चिन्नास्वामीवर स्टाॅयनिस, पूरनचं वादळ; अटीतटीच्या सामन्यात लखनाैचा RCB वर शेवटच्या चेंडूवर विजय”

“ठाण्यातील शिवसेनेच्या बालेकिल्यातील ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण”

ठाकरे गट-शिंदे गट एकत्र येणार?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर, म्हणाले…