Home देश “कर्नाटकमध्ये भाजपला मोठा धक्का, एक्झिट पोलनुसार, काँग्रेसची किती जागांवर मुसंडी?”

“कर्नाटकमध्ये भाजपला मोठा धक्का, एक्झिट पोलनुसार, काँग्रेसची किती जागांवर मुसंडी?”

347

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं एकाच टप्प्यात आज 224 जागांसाठी आज मतदान पार पडलं आहे. त्यानंतर आता 13 मे ला म्हणजेच शनिवारी याची मतमोजणी केली जाणार आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेची आकडेवारी आता समोर येत आहे.

ही बातमी पण वाचा : “एकनाथ शिंदे भाजपच्या तालावर नाचणारे मुख्यमंत्री”

या एक्झिट पोलनुसार, कर्नाटकमध्ये काँग्रेस सर्वाधिक जागांवर निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र तरीही ते बहुमतापासून काही अंतर लांब असणार आहेत.

या एक्झिट पोलची आकडेवारी पहा : 

काँग्रेस – 99-109
भाजप – 88-98
जेडीएस- 21-26
इतर – 0-4

दरम्यान, कुणालाच बहुमत मिळणार नाही, अशी आकडेवारी सध्या समोर येताना दिसत आहे. त्यामुळे कर्नाटकात नेमकी कुणाची सत्ता येणार, याबाबत अद्याप काही सांगता येत नाही.

महत्त्वाच्या घडामोडी –

“सुषमा अंधारेंनी फक्त एक दिवस राज ठाकरेंसमोर बसावं, मग त्यांना कळेल की…”

भाजप शिवसेना नगरसेवक भर सभेतच भिडले; नेमकं प्रकरण काय?

अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी आम्हां सर्वांची इच्छा, पण शरद पवार याबाबत…; ‘या’ आमदाराचं मोठं विधान