Home महाराष्ट्र अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी आम्हां सर्वांची इच्छा, पण शरद पवार याबाबत…;...

अजित दादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी आम्हां सर्वांची इच्छा, पण शरद पवार याबाबत…; ‘या’ आमदाराचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र या चर्चेला अजित पवार यांनी स्वत: पूर्णविराम दिला आहे.

जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काम करेन, असं विधान अजित पवारांनी केलं. यावर आता राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरेंचं सरकार फोडून महाराष्ट्रात दुसरं सरकार…; निपाणीच्या सभेत शरद पवारांची भाजपवर टीका

आमच्या पक्षाचे नेते म्हणून अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची सर्वांची इच्छा आहे. अजित पवारांमध्ये ती पात्रता, क्षमता आणि योग्यता आहे. शरद पवारांप्रमाणे अजित पवार सकाळी 7 पासून कामाला सुरूवात करतात. महाराष्ट्रातील प्रत्येक गोष्टीची जाणीव आणि अभ्यास असलेला नेता मुख्यमंत्री व्हावा, अशी राष्ट्रवादीच्या लोकांची इच्छा आहे. पण, शरद पवार आणि महाविकास आघाडी याबाबत निर्णय घेईन, असं शशिकांत शिंदे म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

दरम्यान, महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाला, तर येणारा मुख्यमंत्री तिन्ही पक्षातून एक असेल. त्यात अजित पवारांना संधी मिळाली, तर महाविकास आघाडी आणखी बळकट होईल., असंही शशिकांत शिंदे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

राष्ट्रवादीला साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांना, अजित पवारांचं जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

मोठी बातमी; भाजप संपर्कातील ‘हा’ मोठा नेता राष्ट्रवादीच्या गळाला

‘द केरळ स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ; पहिल्याच दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई