Home क्रीडा BCCI अध्यक्षाच्या मुलामुळे, माझं करिअर बर्बाद झालं; टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूचा...

BCCI अध्यक्षाच्या मुलामुळे, माझं करिअर बर्बाद झालं; टीम इंडियाच्या ‘या’ स्टार खेळाडूचा गंभीर आरोप

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भारतीय संघाचा माजी खेळाडू अंबाती रायडू याने यंदाच्या आयपीएलनंतर क्रिकेटधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं होतं.

देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करूनही त्याला टीम इंडियाकडून फारशी संधी मिळाली नाही. मात्र काही काळानंतर रायडूला काही सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्त्व करण्याची संधी मिळाली. निवड झाल्यावर मात्र तो कायम आत-बाहेर होताना दिसला. अशातच आता रायडू राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. यावरून आता रायडूने प्रतिक्रिया देत बीसीसीआय अध्यक्षांवर मोठे आरोप केले आहेत.

ही बातमी पण वाचा : भाजप-शिंदे गटात वादाची ठिणगी; ‘या’ भाजप नेत्याची मुख्यंत्र्यांवर टीका

बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांनी, आपल्या मुलाचे करिअर घडवण्यासाठी माझं करिअर उद्ध्वस्त केल्याचा आरोप अंबाती रायडूने यावेळी केला आहे. एका मुलाखतीत बोलत असताना, रायडूने हा आरोप केला आहे.

मी लहान असताना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये राजकारण सुरू झाले. शिवलाल यादव यांचा मुलगा अर्जुन यादव याला टीम इंडियामध्ये भरवल्याबद्दल माझा छळ झाला. मी अर्जुन यादवपेक्षा चांगला खेळत होतो, त्यामुळेच त्याने मला हटवण्याचा प्रयत्न केला. 2003-04 मध्ये मी इंडिया-अ साठी चांगली कामगिरी केली होती. पण 2004 मध्ये निवड समिती बदलली आणि शिवलाल यादव यांच्या जवळचे लोक त्यात सामील झाले, त्यामुळे मला संधी मिळाली नसल्याचं, रायडूनं यावेळी सांगितलं.

दरम्यान, जवळपास 4 वर्षे मला कोणाशी बोलू दिलं नाही. शिवलाल यादव यांच्या लहान भावाने अनेकवेळा मला शिवीगाळ केली होती. त्यावेळी मी खूप तणावाखाली होतो. त्यामुळे मला हैदराबाद सोडून आंध्र प्रदेशात जावं लागलं. मात्र तिथेही आंध्र प्रदेश संघाचा कर्णधार प्रसाद यांच्याशी त्याचे मतभेद झाले आणि पुन्हा हैदराबादमध्ये आल्याचं रायडूने यावेळी सांगितलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही…; नाना पटोलेंचा इशारा

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले आहेत; मनसेचा आक्रमक पवित्रा

मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी…; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट