Home देश “काँग्रेसला आणखी एक धक्का?; ‘हा’ मोठा नेता पक्षाला रामराम ठोकणार?”

“काँग्रेसला आणखी एक धक्का?; ‘हा’ मोठा नेता पक्षाला रामराम ठोकणार?”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमधील मधील नेते पक्ष सोडून जात आहेत. अशातच आणखी एक भर पडली आहे. काँग्रेसचा आणखी एक मोठा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.

हे ही वाचा : कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा शिवसेनेला दणका! कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीत भाजपासोबत केली युती

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी केलेल्या ट्विटमुळं ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. हरीश रावत यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘न दैन्यं न पलायनम्’ या कवितेचा आधार घेत ट्विट केलं आहे.

निवडीचा समुद्र तरंगत असताना बहुतांश ठिकाणी सहकारासाठी संघटनात्मक बांधणी सहकाराचा हात पुढे करण्याऐवजी एकतर पाठ फिरवत आहे किंवा नकारात्मक भूमिका घेत आहे, हे विचित्र नाही का. ज्या समुद्रात पोहायचे आहे, त्यात सत्तेने अनेक मगरी सोडल्या आहेत. ज्यांच्या आदेशानुसार पोहायचे आहे, त्यांचे हस्तक माझे हात-पाय बांधत आहेत. मनात अनेक विचार येत आहेत. हरीश रावत आता बस, खूप पोहलो, आता विश्रांतीची वेळ आली आहे., असं रावत म्हणाले.

पुन्हा एकदा मनाच्या एका कोपऱ्यातून आवाज येत आहे, ‘न दैन्यं न पलायनम्’ (कोणतीही दया नको, आव्हानांना घाबरून पळायचे नाही, त्याचा सामना करायचा). खूप चलबिचल सुरू आहे, कदाचित नवे वर्ष रस्ता दाखवेल. भगवान केदारनाथ मला या स्थितीत मार्गदर्शन करतील, असा मला विश्वास आहे., असंही रावत म्हणाले.

दरम्यान, ऐन निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर रावत यांची नाराजी काँग्रेससाठी मोठा धक्का बसू शकतो.

महत्वाच्या घडामोडी –

“राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पिंपरीत घेणार मेळावा”

अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का?; किशोरी पेडणेकरांचा संतप्त सवाल

ST WORKER STRIKE! कामावर हजर व्हा, निलंबन व बदल्या रद्द करू; परिवहन मंत्री अनिल परब यांची मोठी घोषणा