Home महाराष्ट्र ST WORKER STRIKE! कामावर हजर व्हा, निलंबन व बदल्या रद्द करू; परिवहन...

ST WORKER STRIKE! कामावर हजर व्हा, निलंबन व बदल्या रद्द करू; परिवहन मंत्री अनिल परब यांची मोठी घोषणा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटीतील कर्मचाऱ्यांनी 29 ऑक्टोबरपासून संप पुकारलेला आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांच्या पगारात 41 टक्क्यांनी वाढही केली. मात्र अजूनही एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. त्यानंतर परवा दिवशी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेत असल्याची घोषणा अजय गुजर यांनी घोषणा केली.

हे ही वाचा : “हिंदुजा हाॅस्पिटल पॅनेलवर मनसेचा भगवा झेंडा फडकला, 15 पैकी 13 जागांवर मनसेनं मारली बाजी”

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर अनिल परब आणि अजय गुजर यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचं आवाहन केलं. जे कर्मचारी कामावर हजर होतील त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई मागे घेऊ, अशी घोषणा अनिल परब यांनी यावेळी केली.

जे कर्मचारी विहित कालमर्यादेत आगारात हजर होतील त्यांना कामावर हजर करून घेऊन काम देण्याचे आदेश महामंडळाला देण्यात आले आहेत. तसेच आगारातील वाहतूक पूर्ववत सुरु झाल्यानंतर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन तात्काळ मागे घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत., अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

दरम्यान, ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे, त्यांची बडतर्फी शिस्त आणि आवेदन कार्यपध्दतीनुसार मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांच्याविरुद्ध संप कालावधीत गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घेतले जातील. तसेच ज्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे, त्यांची सेवा समाप्ती मागे घेण्यात येणार आहे, असंही अनिल परब यांनी सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी –

“हिंदुजा हाॅस्पिटल पॅनेलवर मनसेचा भगवा झेंडा फडकला, 15 पैकी 13 जागांवर मनसेनं मारली बाजी”

…याची या सरकारला जराही शरम वाटत नाही; चंद्रकांत पाटलांची जहरी टीका

पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडियावर केली पक्षाची बदनामी; मनसेने केली पक्षातून हकालपट्टी