Home महाराष्ट्र …याची या सरकारला जराही शरम वाटत नाही; चंद्रकांत पाटलांची जहरी टीका

…याची या सरकारला जराही शरम वाटत नाही; चंद्रकांत पाटलांची जहरी टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यातील राजकारण चांगलंच पेटलं आहे. हिवाळी आधिवेशनावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. आपण पदोपदी लोकशाही पायदळी तुडवत आहोत याची या सरकारला जराही शरम वाटत नाही, अशी टीका पाटील यांनी केली आहे.

हे ही वाचा : पदाधिकाऱ्यांनी सोशल मिडियावर केली पक्षाची बदनामी; मनसेने केली पक्षातून हकालपट्टी

आपला मनमानी कारभार आणि जनतेच्या समस्या यांची विधीमंडळात चर्चा होऊ नये, तसेच अडचणीत आणणारे प्रश्न विचारले जाऊ नयेत यासाठी कमीतकमी दिवसांचे हिवाळी अधिवेशन आयोजित करण्याचे षडयंत्र महाविकास आघाडी सरकारने आखले आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

ठाकरे सरकार रोखशाही आणि रोकशाही सरकार आहे. या सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रात भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बलात्कार, संप, आंदोलने जितक्या प्रमाणात होत आहे, तितकी यापूर्वी कधीही झाली नव्हती. या सरकारच्या मनमानी कारभारामुळेच महाराष्ट्रात प्रत्येक समाजघटकावर आत्महत्येची वेळ आली आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल”

“भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का, ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

मी आबांच्या पाऊलावर पाऊल टाकत आहे, त्यामुळे…; रोहित पाटलांनी दिला वडिलांच्याआठवणींना उजाळा