आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन्ही शिवसेना गटाचा मेळावा पार पडला. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचा मेळावा शिवतीर्थावर, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाचा मेळावा बीकेसी मैदानावर पार पडला.
पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणावरून आता विरोधकांनी त्यांच्यावर आता टीका करण्यास सूरूवात केली आहे. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील शिंदेंवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंना आत्मचिंतनाची गरज; सुधीर मुनगंटीवार यांचा उद्धव ठाकरेना सल्ला
अजित पवार सत्ता गेली म्हणून ओरडतोय असं वाटेल. पण तसं नाहीय. सत्ता येते, सत्ता जाते. आम्ही सत्तेसाठी हापहापलेले नाही आहोत. जी जबाबदारी जनता देईल ती आम्ही पार पाडू. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिथं भाषण करत असताना सारखं ‘ही लोक बसलेली आहेत ती आपणहून आली आहेत,’ असं ते (मुख्यमंत्री) म्हणत होते. अरे निम्मी तर तुमच्या भाषणात निघून गेली. मग कशी आपणहून आली? खुर्चा मोकळ्या झाल्या. आपणहून आलेल्या लोकांनी खुर्च्या मोकळ्या का केल्या?, असा सवालही अजित पवारांनी यावेळी केला.
10 कोटी रुपये तुम्ही एसटीला भरता. कुठून आले 10 कोटी रुपये? तुम्ही गावच्या एसटी तिकडे आणल्यात. एसटी रद्द कराव्या लागल्या ग्रामीण भागात. त्यांना एसटी मिळाल्या नाहीत त्या दिवशी, यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का?, असा प्रश्नही अजित पवारांनी शिंदेंना यावेळी केला. तसेच एकनाथ शिंदे पण कायमचे तिथे बसायला नाही आले. उद्या 145 चा आकडा बाजूला गेला तर या ही बाबाला घरी जावं लागेल. कुठेतरी अंतर्गमुख होऊन त्यांनी विचार केला पाहिजे, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
भाजपने विरोध केलेला आदिपुरूष चित्रपटाला आता मनसेचा पाठिंबा, म्हणाले…
मोठी बातमी! IPL च्या ‘या’ खेळाडूला अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आरोप