आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन शिंदे सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांच्यासह आठ आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला.
मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता, असं अजित पवार यांनी सांगितलं. तसच आम्ही आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या नावाने आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
ही बातमी पण वाचा : राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे की…; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार यांनी आम्ही राष्ट्रवादी म्हणूनच सरकारमध्ये सामील झाल्याचं स्पष्ट केलं. आम्ही आगामी निवडणुका राष्ट्रवादीच्या नावाने आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावरच लढणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच भाजपसोबत जाण्याबाबत आमच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. अखेर त्याला मूर्त स्वरुप आलं, असं अजित पवार म्हणाले आहेत.
आज काही जण पोहोचू शकले नाहीत. काहीजण परदेशात आहे. विशेषत: मी लोकप्रतिनिधींविषयी बोलतो. त्यांच्याशी मी संपर्क साधलाय. त्यांनी मान्यता दिली आहे. काही जण आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील. अशा पद्धतीने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. आमच्यासोबत जास्तीत जास्त आमदार आणि खासदार आहेत, असा दावाही अजित पवारांनी केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
अजित पवारांच्या शपथविधीवर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
शरद पवार यांची सर्वात पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….
मोठी बातमी! अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ