Home औरंगाबाद कर्नाटकविरोधात उध्दव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; कर्नाटक बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून काळं फसलं

कर्नाटकविरोधात उध्दव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; कर्नाटक बसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून काळं फसलं

231

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या सीमेवरील काही गावांवर हक्क सांगितल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच तापल्याचं बघायला मिळत आहे. अशातच काल कर्नाटकमधील हिरेबागेवाडी येथे महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. यामुळं सीमावाद आणखीच चिघळला आहे. अशातच आता ठाकरे गट कर्नाटकाविरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे.

हे ही वाचा :  मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदेंचं, देवेंद्र फडणवीसांसमोर मोठं विधान, म्हणाले…

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या वाहनांवर जय महाराष्ट्र लिहीत कर्नाटकच्या नावावर काळे फासले.

दरम्यान, कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. सकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास औरंगाबादमधून कर्नाटक बस सुटतात यावेळी कार्यकर्त्यांनी एकत्र येत कर्नाटकच्या वाहनांवर काळे फासले.

महत्त्वाच्या घडामोडी –

“राज ठाकरेंनी संधी दिली, तर पुन्हा जोमाने काम करणार; हकालपट्टीनंतर ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण”

… तर 48 तासात मला कर्नाटकला जावं लागेल; शरद पवारांचा सरकारला इशारा

बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड; महाराष्ट्रात मनसे आक्रमक