Home पुणे “राज ठाकरेंनी संधी दिली, तर पुन्हा जोमाने काम करणार; हकालपट्टीनंतर ‘या’ नेत्याच्या...

“राज ठाकरेंनी संधी दिली, तर पुन्हा जोमाने काम करणार; हकालपट्टीनंतर ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मनसेचे पुण्यातील माथाडी कामगार सेनेचे अध्यक्ष निलेश माझिरे यांची मनसेने पदावरून हकालपट्टी केली होती.

पदावरून दूर केल्यानंतर माझिरे यांनी जवळपास 400 कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मनसेला राम राम ठोकला. त्यानंतर माझिेरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

हे ही वाचा : … तर 48 तासात मला कर्नाटकला जावं लागेल; शरद पवारांचा सरकारला इशारा

जर राज ठाकरेंनी पुन्हा संधी दिली तर पुन्हा काम करणार, असं माझिरे म्हणाले. माझिरे यांच्या या विधानामुळे ते पुन्हा मनसेत परतणार का?, या चर्चांना आता उधाण आलं आहे.

दरम्यान, मला कोणतीही कल्पना न देता जिल्हाध्यक्षपदावरून काढण्यात आलं. राज ठाकरे आजही माझे दैवत आहेत. पक्ष किंवा पक्षप्रमुखावर माझी काहीही नाराजी नाही. या मुद्द्यावरून मी राज ठाकरेंना भेटणार आहे. जर राज ठाकरेंनी पुन्हा संधी दिली तर पुन्हा काम करणार. मात्र, मला राज ठाकरेंना भेटून अडचण सांगायची आहे. माझा वाद विठ्ठलाशी नाही, त्यांच्या भोवती असलेल्या बडव्यांशी आहे., असंही माझिरे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी –

बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड; महाराष्ट्रात मनसे आक्रमक

महाराष्ट्रातील सत्ता एकदा माझ्या हातात द्या, अन्…; राज ठाकरेंचं मोठं विधान

विराट मोर्चा काढत आहेत त्यांना…; मुख्यमंत्री शिंदेंचं, ठाकरेंना प्रत्युत्तर