Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील सत्ता एकदा माझ्या हातात द्या, अन्…; राज ठाकरेंचं मोठं विधान

महाराष्ट्रातील सत्ता एकदा माझ्या हातात द्या, अन्…; राज ठाकरेंचं मोठं विधान

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : मला एकदा महाराष्ट्रातील सत्ता हातात द्या, मग महाराष्ट्र कसा करतो पहा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरेंनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

कोकणातल्या जनतेची देहबोली ही आशादायक असून याठिकाणी स्थानिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मला मेहनत करणारी माणसे हवी त्याकरिता स्वतःहून पुढे या, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हंटल आहे.

हे ही वाचा : विराट मोर्चा काढत आहेत त्यांना…; मुख्यमंत्री शिंदेंचं, ठाकरेंना प्रत्युत्त

पक्ष बांधणीच्या आड दुसरा पक्ष आल्यास त्यांना तुडवा आणि पुढे जा, असं सांगतानाच येत्या काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा असा टाइट बांधतो, की कुणी हात लावू शकणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची ताकद वाढवण्यासाठी राज्यभरात दौरे सुरु केले आहे. सध्या ते कोकण दौऱ्यावर आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्राच्या अपमानाविरोधात आता ठाकरे रस्त्यावर; ‘या’ तारखेला महाविकास आघाडीचा विराट मोर्चा”

मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार?; थेट अजित पवारांकडून ऑफर

…तर त्यांची जीभ छाटली पाहिजे; शिवरायांवरील वक्तव्यावरून रूपाली पाटील आक्रमक