Home मनोरंजन “अभिनेत्री अमृता रावने मुलाच्या पहिल्या फोटोसोबत शेअर केलं त्याचं नाव”

“अभिनेत्री अमृता रावने मुलाच्या पहिल्या फोटोसोबत शेअर केलं त्याचं नाव”

मुंबई : अभिनेत्री अमृता रावने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आई झालेल्या अमृताने आपल्या मुलाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याचं नाव चाहत्यांना सांगितलं आहे. अभिनेत्री आणि तिचा नवरा आरजे अनमोल यांनी आपल्या मुलाचं नाव वीर असं ठेवलं आहे.

अमृताने इंस्टावर नवऱ्याची पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. फोटोत या जोडीने बाळाच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. बाळाच्या जन्माच्या 5 दिवसांनंतर अमृताने आपल्या बाळाचा फोटो शेअर करत चाहत्यांना त्याची झलक दाखवली आहे.

अमृता आणि अनमोलनं आपल्या बाळाचा पूर्ण फोटो दाखवला नाही. तर तिघांचेही हात दिसत आहेत. अमृता, अनमोलनं आपल्या हातात बाळाचा हात धरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला अमृतानं कॅप्शन दिलं आहे, हॅलो वर्ल्ड. हा आमचा मुलगा वीर. तुम्हा सर्वांचे त्याला आशीर्वाद हवे आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

तुमच्यात दम असेल तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं योगी आदित्यनाथांना खुलं आव्हान

कराल काय स्वतःला अटक??? न्ह्या स्वतःला फरफटत; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

नारायण राणेंची 2024 साली हद्दपारी निश्चित; शिवसेनंचं राणेंना प्रत्युत्तर

दहावी-बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड