तुमच्यात दम असेल तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं योगी आदित्यनाथांना खुलं आव्हान

0
168

मुंबई : इथली चित्रपट सृष्टी उत्तर प्रदेशला नेणार, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. यावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते चित्रपट क्षेत्राशीसंबधित वेबिनार कार्यक्रमात बोलत होते.

तुमच्यात क्षमता असेल तर जरूर नेऊन दाखवा, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. महाराष्ट्रात चित्रपट आणि करमणूक क्षेत्र अधिक बळकट करून त्यांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी ज्या काही गोष्टी करण्याची गरज आहे ते करू, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, इंडस्ट्रीकडे केवळ करमणूक करणारं क्षेत्र म्हणून पाहिलं जातं. पण रडविण्यापेक्षा हसविणे फार अवघड असते आणि ती ताकद या माध्यमात आहे. मेरा नाम जोकरमध्ये सगळ्यांना हसविणाऱ्या जोकरचं एक आयुष्य आहे, त्यालाही अश्रू येतात. त्याप्रमाणे या इंडस्ट्रीला येणारे अश्रू सरकार म्हणून आम्ही पुसणं गरजेचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

कराल काय स्वतःला अटक??? न्ह्या स्वतःला फरफटत; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

नारायण राणेंची 2024 साली हद्दपारी निश्चित; शिवसेनंचं राणेंना प्रत्युत्तर

दहावी-बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरु करण्याचा‌ विचार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

व्हॉट्सऍप वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; आता व्हॉट्सऍपवरूनही पैसे पाठवता येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here