Home मनोरंजन “अभिनेते किरण माने यांच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष, म्हणाले, सेक्सची भूक...

“अभिनेते किरण माने यांच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष, म्हणाले, सेक्सची भूक ही…”

381

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : अभिनेते किरण माने हे सध्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. सध्या सोशल मीडियावर त्यांची अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे.

संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग शेअर करत किरण माने यांनी सध्यस्थितीवर भाष्य केलं आहे.

सेक्सची भूक’… ही गोष्ट लै खत्तरनाक भावांनो ! त्या नादात मानूस एकदा का घसरला की भल्याभल्यांचं माकड होतं.. एकवेळ ‘बाटली’तनं मानूस सहज भायेर पडंल, पन बाईच्या मोहाच्या ‘पिंजर्‍यात’ अडकला की त्याच्या ‘नशिबानं थट्टा मांडली’च म्हनून समजा., असं किरण माने यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

हे लक्षात घेऊनच आपल्या तुकोबारायावर खार खाऊन असलेल्या विरोधकांनी त्याच्या बदनामीसाठी ‘हनी ट्रॅप’ लावलावता भावांनो.. पन चारीत्र्यवान तुकोबारायानं त्या बाईला आदरानं दूर करत असा उपदेश केला की तीसुद्धा या विचारांनी भारावून गेली.. अंतर्बाह्य बदलून गेली ! आपले तुकोबाराया त्या बाईला म्हन्ले : पराविया नारी रखुमाईसमान । हें गेलें नेमून ठायींचें चि ।। जांई वो तूं माते न करीं सायास । आम्ही विष्णुदास नव्हों तैसे ।। न साहावें मज तुझें हें पतन । नकों हें वचन दुष्ट वदों ।। तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार । तरी काय नर थोडे जाले ।। आम्ही स्वत:ला एक नियमच घालुन ठेवलाय – परस्त्री रखुमाईसमान ! ..माझे माऊली, तू जा इथनं.. आम्हाला आकर्षित करायचे कसलेही प्रयत्न करू नकोस.. आम्ही विष्णुदास तसे नसतो. …एका स्त्रीचं असं अध:पतन होणं, मला सहन होत नाही, तू ते वावगे शब्द तोंडातून काढूही नकोस.
शेवटी तुका म्हणे, “तुला जर नवराच पायजे – तुला संगच हवाय तर बाहेर नरांची कुठं कमी आहे?” ,असं किरण माने यांनी या पोस्टमध्ये म्हटलं.

महत्त्वाच्या घडामोडी –

समृद्धीवर मनसैनिकांनी टोलनाका फोडला, आता यावर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“IND W विरूद्ध BAN W, सामना बरोबरीत सुटूनही सुपर ओव्हर का नाही?; वाचा, नक्की काय आहे कारण”

“मी, अजित अनंतराव पवार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…!” लवकरच….”