मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी नागपुरात बसल्या बसल्या, लाख-दीड लाख पीपीई किट पाठवतो

0
176

नागपूर : जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर मी नागपुरात बसल्या बसल्या, लाख-दीड लाख पीपीई किट नागपूरहून मुंबईला पाठवायला तयार आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

पीपीईबद्दल मी स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवर सांगितलं. ते म्हणाले मी कलेक्टरशी बोलतो. त्यानंतर मग मी स्वत: नागपूरच्या कलेक्टरना सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा फोन येईल, जरुर ती व्यवस्था करुन द्या. मुख्यमंत्र्यांशी माझा संवाद झाला आहे, असं नितीन गडकरी म्हणाले.

आम्ही महाराष्ट्र सरकारच्या मागे उभे आहोत, ही राजकारणाची वेळ नाही, एकमेकाला दोष देण्याची वेळ नाही. एकमेकांना मदत करण्याची ही वेळ आहे, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पुन्हा एकदा पत्र, म्हणाले…

महसुलासाठी वाईन शाॅपचा विचार करा; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा प्रस्ताव बेकायदेशीर- चंद्रकांत पाटील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here