Home महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पुन्हा एकदा पत्र, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं पुन्हा एकदा पत्र, म्हणाले…

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. या पत्रात राज्यातील वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या राज्यातील वैधानिक विकास मंडळांची मुदत 30 एप्रिल 2020 रोजी संपते आहे. प्रादेशिक असमोल दूर करण्याबाबत या मंडळांची भूमिका आणि मदत आत्तापर्यंत अतिशय महत्त्वाची राहिली आहे हे आपण जाणताच. असं असलं तरीही अद्यापही प्रादेशिक असमोतल दूर करण्यात 100 टक्के यश आपण गाठू शकलो नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नियोजनात्मक पातळीवर अतिशय महत्त्वाची भूमिका असलेल्या या मंडळांना मुदतवाढ देणं आवश्यक आहे. तशी कारवाई आपण लगेच करावी ही विनंती करण्यासाठीच पत्र लिहित आहे, असं फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

महसुलासाठी वाईन शाॅपचा विचार करा; राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा प्रस्ताव बेकायदेशीर- चंद्रकांत पाटील

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत माणुसकीला काळीमा फासणारी घटना

विरोधी पक्षनेत्याचं घर राजभवनाच्या दारात आहे का?; संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल