आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आर्यन खान ड्रग्जप्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी त्यांच्यावर अनेक आरोप केले. याप्रकरणी आता मनसेनेही मौन सोडले असून अप्रत्यक्षपणे वानखेडे यांना पाठिंबा दर्शविला आहे.
हे ही वाचा : शिवसेनेचा भाजपला मोठा दणका; भाजपात गेलेले ‘ते’ 10 नगरसेवक ठरले अपात्र
नुकतेच सुनील गावसकर यांच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 50 वर्षे झाल्याच्या निमित्ताने मुंबई क्रिकेट संघटनेच्या वतीने शुक्रवारी वानखेडे स्टेडियमवर विशेष कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमावरुन मनसे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी ठाकरे सरकारवर टोला लगावत समीर वानखेडे यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शविला आहे.
दरम्यान, त्या कार्यक्रमाचा फोटो शेअर करत संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर यांनी ‘वानखेडेला शुभेच्छा’ असे ट्विट केल्याने राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा रंगल्या आहे.
“वानखेडे”ला शुभेच्छा!! pic.twitter.com/NvJdLSLeH6
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 30, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“अपेक्षेपेक्षा जास्त देऊनही भास्कर जाधवांनी शरद पवारांची साथ सोडली”
”तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याच्या उत्पन्नातून एसटी चालेल एवढं त्याने कमावलंय”; नारायण राणेंची टीका
जळगावमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; भाजपचा ‘हा’ मोठा नेता असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत