Home महाराष्ट्र शिवसेनेचं काहीही झालं तरी चालेल पण सरकार पाच वर्ष टिकलं पाहिजे, हा...

शिवसेनेचं काहीही झालं तरी चालेल पण सरकार पाच वर्ष टिकलं पाहिजे, हा तर…; दरेकरांचा टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई: शिवसेनेचं काहीही झालं तरी चालेल पण सरकार पाच वर्ष टिकलं पाहिजे, असा एकतर्फी कार्यक्रम शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी हाती घेतला आहे. त्यामुळेच राऊतांची दिवस न् रात्र धावपळ सुरू असते, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी लागावला आहे. ते मीडियाशी संवाद साधताना बोलत होते.

सामना अग्रलेखातून टीका करताना महाविकास आघाडी सरकारमध्ये सध्य स्थिति काय आहे, याचं भान राऊत यांना नाही. त्यांचा फक्त एकतर्फी कार्यक्रम सुरू आहे. राष्ट्रवादी नेते शरद पवार यांच्यामुळे आघाडी सरकार आलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे काहीही होऊदे. परंतु, 5 वर्ष हे सरकार टिकलं पाहिजे यासाठी केवळ राऊत यांची धावपळ सुरू आहे, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“दुधा तुपाच्या गुळण्या करणाऱ्या भाजप नेत्यांची मस्ती जनता लवकरच उतरवेल”

आता शरद पवारांबद्दल काही लोक खरं बोलत आहेत- गोपीचंद पडळकर

दसरा मेळाव्याआधी शिवसेना-भाजपने एकत्र आलं पाहिजे- रामदास आठवले

“अखेर अनिल परब यांचा किरीट सोमय्यांविरोधात 100 कोटींचा दावा दाखल”