Home महाराष्ट्र मुंबईतल्या समुद्रात 50 हजार कोटींचा पूल उभारणार- नितीन गडकरी

मुंबईतल्या समुद्रात 50 हजार कोटींचा पूल उभारणार- नितीन गडकरी

मुंबई : मुंबई-दिल्ली हायवे वरळी सी-लिंकला जोडणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

दिल्ली-मुंबई हायवेला वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचं स्वप्न असून त्यासाठी 50 हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे, वरळी-वांद्रे सी लिंक, 55 उड्डाणपूल अशी अनेक कामं केली. पण एक गोष्ट राहून गेली. मला वरळी-वांद्रे सी लिंक वसई विरारच्या पलीकडे नेऊन दिल्ली-मुंबई हायवेला जोडायचा होता., अशी खंत नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, आता मी दिल्ली-मुंबई हायवे एक लाख कोटींचा बांधत असून तो जेएनपीटीपर्यंत आहे. त्याचं 60 टक्के काम पूर्ण झालं आहे. त्या हायवेला वरळी सी लिंकपर्यंत पोहोचवण्याचं माझं स्वप्न आहे. त्यासाठी 50 हजार कोटींचा उड्डाणपूल समुद्रात बांधण्याची योजना आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“ठाकरे सरकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात लबाड सरकार म्हणून होईल”

ताटं वाजवल्यामुळेच आपल्या देशात अवदसा आली; काँग्रेस

प्रीतम मुंडे यांनी ‘मराठा आरक्षणाबाबत’ जे वक्तव्य केलं ते…- संभाजीराजे

ठाकरे सरकारला आता विचारावेसे वाटते तुमची “इयत्ता कंची?”; आशिष शेलारांची टीका