Home देश प्रीतम मुंडे यांनी ‘मराठा आरक्षणाबाबत’ जे वक्तव्य केलं ते…- संभाजीराजे

प्रीतम मुंडे यांनी ‘मराठा आरक्षणाबाबत’ जे वक्तव्य केलं ते…- संभाजीराजे

नवी दिल्ली : भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत मत मांडले. तसेच प्रत्येक नेता येतो आणि केवळ मराठा आरक्षणावर बोलतो; पण OBC आरक्षणाचे काय? असा सवाल केला होता. यावर संभाजीराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

समाजाचा विषय मी शेवटपर्यंत नेण्यासाठी सतत काम करत आहे. ओबीसी समाजासोबत आम्ही काम करतो आहे. ओबीसींचे नेते भेटल्यावर आमच्यावर कधी लक्ष देणार असे म्हणतात. मी दोन-तीन अमेडमेन्ट सुचवल्या आहेत. आरक्षण मिळवून देण्याचा हा पहिला टप्पा आहे. 127 व्या घटनादुरुस्तीमध्ये SEBC मध्ये आरक्षण देता येईल. या विधेयकाचे स्वागतच आहे, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

प्रीतम मुंडे यांनी मराठा आरक्षणाबाबत जे वक्तव्य केले आहे, ते विरोधात्मक आहे. असं  म्हणत ओबीसी, मराठा आणि इतर जाती एकाच छताखाली राहतात. त्यांचे वक्तव्य 127 व्या घटनादुरुस्तीशी संबंधित नव्हते. मागास सिद्ध करण्याची संधी देत आहेत. केंद्र सरकारने जसे EWS दिले, तसे तुम्हालाही करता येईल. दंगली करणे हा मार्ग नाही, असंही संभाजीराजेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ठाकरे सरकारला आता विचारावेसे वाटते तुमची “इयत्ता कंची?”; आशिष शेलारांची टीका

आरक्षणावर नारायण राणे का बोलले नाहीत?; संजय राऊतांचा सवाल

“राज्यातील निर्बंधांमध्ये शिथीलता, वाचा नवी नियमावलीनुसार काय सुरू, काय बंद?”

“ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावं स्टेडियमला दिली जाताहेत”