Home महाराष्ट्र आरक्षणावर नारायण राणे का बोलले नाहीत?; संजय राऊतांचा सवाल

आरक्षणावर नारायण राणे का बोलले नाहीत?; संजय राऊतांचा सवाल

मुंबई : लोकसभेत मंजूर झालेल्या 127 व्या घटना दुरुस्तीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे आणि रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधलाय.

सरकारने हा तिढा कायम ठेवला आहे. 50 टक्क्यांची मर्यादा जो पर्यंत उठवली जात नाही तोपर्यंच राज्यांना अधिकार देऊन काहीच उपयोग नाही. लोकसभेतल्या सर्व खासदारांनी हिच मागणी केली आहे. मला आश्चर्य वाटतं की, महाराष्ट्रातल्या भाजपाच्या खासदारांनी तोंड का उघडलं नाही? त्यांनी सुद्धा बोलायला हवं होतं. रावसाहेब दानवे, नारायण राणे का बोलले नाहीत? जे एकत्र येऊन आंदोलन करत होते त्यांनी या 50 टक्क्यांवर बोलायला हवं होतं, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ते एबीपी माझाशी बोलत होते.

आतापर्यंत लाखों लोकांनी यासाठी मोर्चे काढले. अनेकांनी आपले प्राण गमावले. हे सर्व चाललंय तो केंद्र सरकारला खेळ वाटतोय का. आम्ही या विधेयकाला समर्थन देतोय. यामध्ये आम्हाला कोणताही अडथळा आणायचा नाही. पण आमची अपेक्षा आहे की सरकारने संवेदनशीलता दाखवून 50 टक्क्यांची मर्यादा उठवायला हवी,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“राज्यातील निर्बंधांमध्ये शिथीलता, वाचा नवी नियमावलीनुसार काय सुरू, काय बंद?”

“ज्यांनी आयुष्यात कधी बॅट पकडली नाही, त्यांची नावं स्टेडियमला दिली जाताहेत”

अशोकराव, मराठा समाजाला आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा- चंद्रकांत पाटील

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ‘या’ माजी प्रदेश उपाध्यक्षांवर गुन्हा दाखल”