पुणे : संभाजी छत्रपती यांनी आज उदयनराजे भोसले यांच्याशी मराठा आरक्षणावर 25 मिनिटे चर्चा केली. त्यानंतर दोन्ही राजेंनी मीडियाशी संवाद साधून मराठा आरक्षणाविषयी भूमिका मांडली.
दोन्ही छत्रपती घराण्याने समाजाला नेहमीच दिशा दिली आहे. दिशाभूल करणं, संभ्रम निर्माण करणं आमच्या रक्तात नाही, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी म्हटलं आहे.
खासदार उदयनराजे भोसलेंबरोबर सविस्तर चर्चा झाली असून सर्वच मुद्दयांवर आमचं एकमत आहे. आमच्यात कोणतंही दुमत नाही. आम्ही नेहमीच एकत्रित काम करत आलो आहोत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 338 बी नुसार आयोग स्थापन करावं लागेल. मराठा समाज हा सामाजिक मागास असल्याचं सिद्ध करावं लागेल. हा अहवाल राज्यपालांना पाठवावा लागेल. राज्यपाल राष्ट्रपतींना पाठवतील, मग तो केंद्रीय मागास आयोगाकडे जाईल. त्यांना वाटल्यास ते आरक्षण देतील, असं खासदार संभाजी छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, आरक्षण मिळण्यासाठीचे मी दोन चार पर्याय दिले आहेत. त्यामुळे कोणत्या मार्गाने जायचं हे राज्यकर्त्यानेच ठरवावं, असंही संभाजी छत्रपती म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपाला बिहार निवडणूक लढवायची होती- नवाब मलिक
राजकारण चंचल नसतं, शिवसेनेची विचारधारा चंचल झाली आहे- प्रवीण दरेकर
ह्यांचं फक्त एकच काम, याला फोडा त्याला जोडा; अशोक चव्हाणांची भाजपवर जोरदार टीका
प्रशांत किशोर यांच्या कोणी लागू नका नादी…; रामदास आठवलेंचा कविता स्टाईलमध्ये शरद पवारांना टोला