अहमदाबाद : भारत विरुद्ध इंग्लंड संघात टी20 मालिकेतील शेवटचा सामन्यात भारताने इंग्लंडला 36 धावांनी पराभूत करत 5 सामन्यांची टी20 मालिका 3-2 अशा फरकाने जिंकली.
भारताने इंग्लंडला 225 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 20 षटकात 8 बाद 188 धावाच करता आल्या.
इंग्लंडकडून जोस बटलर आणि डेव्हिड मलानने अर्धशतके केली. तर भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच भुवनेश्वर कुमारने २ विकेट्स घेतल्या. तसेच हार्दिक पंड्या आणि टी नटराजनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
राज्याचे पर्यटन आदित्य ठाकरे यांना करोनाची लागण
100 कोटी खंडणी प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध, त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा- नारायण राणे
परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपावर फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
बीड जिल्हा बँक निवडणूक! परळी मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी