मुंबई : सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र हे केवळ खळबळजनक नाही, हे धक्कादायक अशाप्रकारचं पत्र आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात डीजी रँकच्या अधिकाऱ्याने इतक्या खुलेपणे गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचं पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
या पत्रात त्यांनी एक चॅट जोडली आहे, हा थेट पुरावाच दिसतो आहे की ज्यामधून अशाप्रकरे पैशांची मागणी झाली आहे. त्यामुळे एकुणच हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ” असंही फडणवीस म्हणाले आहेत.
दरम्यान, गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा गंभीर आरोप परबमबीर सिंग यांनी केला आहे.
महत्वाच्या घडामोडी –
बीड जिल्हा बँक निवडणूक! परळी मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी
“ सोनिया गांधी सक्रिय नाहीत ‘UPA’चं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं”
भारत विरूद्ध इंग्लंड पाचवा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
“रात्री 50 मिनिटं व्हॉट्सअॅप डाऊन होतं, मात्र बंगालमध्ये गेल्या 50 वर्षांपासून विकास डाऊन”