Home महाराष्ट्र 100 कोटी खंडणी प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध, त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा- नारायण...

100 कोटी खंडणी प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध, त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा- नारायण राणे

मुंबई : सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परबमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. यावरुन भाजप खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.

सचिन वाझे यांना मर्डर केसमध्ये वाचवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांनाही माहिती दिली होती. मग मुख्यमंत्र्यांनी ती माहिती मिळताच अनिल देशमुखांवर कारवाई का नाही केली? त्यांना मुख्यमंत्र्यांनी का निलंबित केलं नाही?, असा सवाल नारायण राणे यांनी केला. ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना नारायण राणे बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही, याचा अर्थ या शंभर कोटी खंडणीच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही संबंध आहे. वाझेंना वाचवायचंही काम मुख्यमंत्री करतात. मुख्यमंत्र्यांचा सर्व घटनांशी डायरेक्ट संबंध आहे. त्यामुळे त्यांनी त्वरित राजीनामा देणं आवश्यक आहे”,असं नारायण राणे म्हणाले.

दरम्यान, गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं”, असा गंभीर आरोप परबमबीर सिंग यांनी केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपावर फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

बीड जिल्हा बँक निवडणूक! परळी मतदान केंद्रावर भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी

“ सोनिया गांधी सक्रिय नाहीत ‘UPA’चं नेतृत्व आता शरद पवारांनी करावं”

भारत विरूद्ध इंग्लंड पाचवा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय